शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:31 IST

भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.

 डोंबिवली - भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत यांच्यातर्फे पाचव्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाचे येथील सावित्रीबाई फुले नाटयगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुकिया बोलत होते. या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विचारवेध ,बंजारा गीतमाला, ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश चव्हाण, संमेलन स्वागताध्यक्ष शंकर पवार,विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक, नागपूर महाविद्यालयातील प्रिन्सीपल डॉ. गणेश चव्हाण, संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.भुकिया म्हणाले, बंजारा भाषेला कोणत्याही वर्गवारीत न टाकता त्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा. त्यासाठी भारत सरकाराच्या भाषा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. २०१६ मध्ये नरेंद्र मोदींना भेटून त्यांच्याकडे मसूदा सुपुर्द केला आहे, असे सांगितले.शंकर पवार यांनी सांगितले, बंजारा समाजाचे चांगले साहित्य निर्माण झाले पाहिजे. या समाजात एकी दिसून आली पाहिजे. त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघटनेने एकत्र येऊन काम केले पाहिजे. समाजातील नेतेमंडळीनी पुढाकार घेऊन गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे.राजू नाईक म्हणाले, बंजारा समाजाचा जागतिक स्तरावर कोणताही धर्म नाही. या समाजाला जागतिक स्तरावर धर्म म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. राजकारणात लोकसभेप्रमाणे राज्यसभेत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. बंजारा समाजाचे साहित्य इंग्रजी भाषेतून निर्माण झाले पाहिजे. व त्याला जागतिक दर्जाचा वाचक निर्माण झाला पाहिजे, असे सांगितले.प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा भाषेचा समावेश असावा - डॉ. गणेश चव्हाणविद्यार्थ्यांना गोर बंजारा भाषेचे ज्ञान असावे त्यासाठी प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा बोलीभाषेचा समावेश असावा. केवळ बोलीभाषेचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास ही तरूणपिढीला समजला पाहिजे. याकरिता त्यांचा ही समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा यावर बोलताना हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करावे असे मत मांडल्यामुळे त्यांना प्रेक्षकांमधून कोणीच बोलू दिले नाही. त्यांना स्वतंत्र स्थान पाहिजे आहे. संमेलनातील महत्वाचे ठराव- गोर बंजारा बोलीभाषेला संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये भाषेला दर्जा मिळण्यात यावा- महापुरूषांच्या विचारधारेचे साहित्य निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.- समाजामधील वाढती हुंडा पध्दतीसाठी शासनाचे विविध कार्यक्रम व योजना राबविण्यात यावे- गोर बंजारा बोलीभाषेला मौखिक साहित्य निर्माण करणाºया साहित्यीकांना मानधन व प्रवासभत्ता मंजूर करण्यात यावा.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे