शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नूपुर शर्माला पायधुनी पोलिसांचे समन्स; २५ जूनला ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 05:50 IST

वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नेत्या नूपुर शर्माची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत.

मुंबई :

वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या नेत्या नूपुर शर्माची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. तिला पायधुनी पोलिसांनी समन्स बजावत २५ जूनला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. 

शर्माला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी तिला समन्स पाठवले आहेत. वृत्तवहिनीवर चर्चेदरम्यान केलेल्या टिप्पण्यांसंदर्भात तिचा जबाब नोंदविला जाणार आहे, असे पांडे यांनी सांगितले होते. शर्माविरोधात गेल्या आठवड्यात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

रझा अकादमीच्या मुंबई शाखेचे सहसचिव इरफान शेख यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे पायधुनी पोलिसांनी धार्मिक भावना दुखावणे, शत्रुत्वाला चालना देणे आणि सार्वजनिक क्षोभ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविला. तिच्यावर कलम २९५-अ  (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने केलेली कृत्ये), १५३-अ (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५ (२) (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत विधाने) ही कलमे  लावण्यात आली आहेत. 

टॅग्स :BJPभाजपा