शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कासकरच्या ‘सीडीआर’मध्ये मिळाले संशयास्पद नंबर, दुबईत जास्त कॉल्स जात असल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 05:25 IST

खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत.

ठाणे : खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेल्या इक्बाल कासकरच्या कॉल डिटेल्समधून काही संशयास्पद नंबर पोलिसांना मिळाले आहेत. वेळोवेळी कासकरच्या संपर्कात असलेले काही मोबाइल नंबर्स पोलिसांनी नोंद केले आहेत. कासकरचे दुबई येथे जास्त कॉल्स जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या मोबाइल फोनचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) संबंधित कंपनीकडून मागवला होता. त्यानुसार, काही मोबाइल नंबर्सवरून कासकरला वेळोवेळी फोन आल्याचे स्पष्ट झाले आहे. हे मोबाइल नंबर कुणाचे आहेत, त्यांचा कासकरशी काय संबंध, याची चौकशी पोलीस करत आहेत. त्याने पाकिस्तानमध्ये फोन केल्याचे मात्र ‘सीडीआर’मध्ये दिसले नाही. दाऊद, अनिस इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने ‘व्हीओआयपी’ (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली. इक्बाल कासकरसह या सर्व आरोपींच्या पासपोर्टची पडताळणी सुरू केली आहे. पासपोर्टवर स्टॅम्पिंग न करता दाऊदची पत्नी मेहजबीन खान मुंबईत येऊन गेल्याची माहिती पोलिसांना इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान मिळाली होती. त्याच पद्धतीने कासकरही पाकिस्तानला जाऊन आला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसthaneठाणे