आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 05:16 PM2019-10-07T17:16:53+5:302019-10-07T19:19:48+5:30

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.

 The number of men in suicides is higher: Dr. Information of Kusumala | आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला यांची माहिती 

Next
ठळक मुद्दे आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक : डॉ. कुसुममाला जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने कार्यक्रमजगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या

ठाणे: जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक आत्महत्त्या होते. महिलांच्या तुलनेत आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या अधिक आहे. दरवर्षी भारतात एक लाख पुरूषांमध्ये २५ पुरूष तर एक लाख महिलांमध्ये १६ महिला आत्महत्त्या करतात अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुसुममाला यांनी दिली. आत्महत्त्या करण्याचा विचार ज्यांच्या मनात येतो अशांनी कुटुंब, नातेवाईक, मित्र मैत्रिणी किंवा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.
              प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत टाटा मोटर्स येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मानसीक आरोग्याविषयी माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले होते. दरम्यान, एमफील सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आत्महत्त्या करु नका असा संदेश देणारे एक नाटीका सादर केली. २० ते ५० वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्त्येची भावना येत असते. पुरूष जास्त व्यक्त होत नसतात म्हणून त्यांची संख्या अधिक असल्याचे सांगताना डॉ. कुसुममाला म्हणाल्या की, पुरूष खूप धोकादायक पद्धतीने आत्महत्त्या करतात. स्वत:ला शुट करणे, लटकणे किंवा ट्रेनखाली येऊन आत्महत्त्या करतात. महिला तितक्या धोकादायक पद्धतीने करत नाही, गोळ््या घेऊन किंवा हात कापून त्या आत्महत्त्या करतात. मानसीक तणाव, नैराश्य, एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असणे, आर्थिक, मानसीक किंवा कुटुंबाचा पाठिंबा नसले तसेच, घरातील सदस्याने किंवा आजूबाजूला कोणी आत्महत्त्या केली असेल तर ते पाहूनही आत्महहत्त्या होत असल्याची कारणे डॉ. कुसुममाला यांनी स्पष्ट केली. अशा व्यक्ती कशा ओळखाव्या यासंदर्भात बोलताना त्यांनी काही संकेत सांगितले. त्या म्हणाल्या, ती व्यक्ती मरणाच्या गोष्टींबद्दल बोलत असेल, इच्छापत्र बनवून घेत असेल, मी मेलो तर बरे होईल, माझ्यासाठी कोण नाही असे बोलत असेल, रागाच्या भरात वाहन चालवत असेल असे अनेक संकेत असतात. अशी व्यक्ती उदासीन, चिंतेत आणि ताणतणावात असते. जगात दहा आत्महत्त्या होत असतील तर त्यातील चार आत्महत्त्या भारतात होतात, भारत हा ताणतणावाचा देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आत्महत्त्येचा विचार कोणालाही येऊ शकतो, परंतू ज्यांना मानसीक आजार आहे त्यांच्यात ही भावना तीव्र असल्याचे डॉ. कुसुममाला यांनी सांगितले. सामान्यांनी कशा प्रकारे मानसीक रुग्णांशी वागावे याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मानसीक आजार झालेल्या व्यक्तीला एकटे सोडू नका, त्यांच्यात मिळून मिशलून रहा, त्यांना समजून घ्या असे सांगितले. आत्महत्त्या ही रोखली जाऊ शकते असेही त्या म्हणाल्या. यावेळी टाटा मोटर्सचे सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी, मनोविकृतीतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कार्डिले, व्यवसाय उपचारतज्ज्ञ रुपा किणकर, समाजसेवा अधिक्षक फरिदा शेख, सुरेखा वाठोरे व इतर उपस्थित होते.

Web Title:  The number of men in suicides is higher: Dr. Information of Kusumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.