शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९० टक्क्यांच्या घरात, 49 टक्के बेड शिल्लक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:31 IST

रुग्ण वाढल्याने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

ठाणे  : कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, तरीही मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या १६ दिवसांत ठाण्यात कोरोनाचे तब्बल चार हजार ३७१ नवे रुग्ण आढळले आहेत. परंतु,यामध्ये घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या जवळपास ९० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळेच शहरातील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला दोन हजार २५० पैकी एक हजार १५१ बेड वापरात असून एक हजार ९९ बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली.रुग्ण वाढल्याने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. अशातच आता मार्च महिन्यात अवघ्या १६ दिवसात शहरात नवे चार हजार ३७१ रुग्ण वाढल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तीन हजार ४२ एवढी आहे.  तर प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या तीन हजार ४१ एवढी आहे. यामध्ये ७९२ रुग्ण हे असे आहेत, ज्यांची सौम्य लक्षणे आहेत. तर दोन हजार ९१ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे  दिसून आलेली नाहीत. १५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून १४१ आयसीयुमध्ये आहेत. तर १७ रुग्ण हे व्हेटिंलेटरवर आहेत. तर एक हजार ५८७ रुग्ण हे घरीच उपचार घेत असून ९६७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील वर्षी रुग्णालयात बेड मिळत नव्हते. परंतु, या वर्षी मात्र सध्या तरी कुठेही बेड मिळत नाही अशी तक्रार अद्यापही महापालिकेकडे आलेली नाही. महापालिका हद्दीत सध्या विविध रुग्णालयात २५० बेड असून त्यातील एक हजार १५१ आरक्षित असून एक हजार ९९ बेड शिल्लक आहेत. ४९ टक्के बेड शिल्लक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये जनरल बेड एक हजार १३२ असून त्यातील ३१२ आरक्षित असून ८२० बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनचे ७९८ पैकी १४७, आयसीयुचे ३२० पैकी १४९, व्हेंटिलेटरचे १७० पैकी १५३ बेड शिल्लक असून तूर्तास तरी ठाण्यात रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा कहर सुरूच, ५६५ रुग्ण सापडले- केडीएमसी परिक्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गुरुवारी तब्बल ५६५ नव्या रुग्णांची भर पडली असून, २०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. - आतापर्यंत मनपाच्या हद्दीत एकूण ६८ हजार ७३७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यातील ६३ हजार ५८९ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. १२२२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीला ३९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHomeघर