कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:32 IST2020-05-30T01:32:52+5:302020-05-30T01:32:59+5:30

आणखी सात जणांना लागण

Number of corona positive patients in Karjat taluka 27 | कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७

कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७

कर्जत : कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर तर माथेरान रुग्णालयातील तीन डॉक्टरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
माथेरानमधील अन्य चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही रिपोर्ट शुक्रवारी आल्याने एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची
भर पडून कर्जत तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे, अशी माहिती कर्जत तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

शुक्रवारी सातपैकी चार माथेरानमधील आणि तीन कर्जत नगर परिषद क्षेत्रातील आहेत. यामध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे, तीनच दिवसांपूर्वी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील एक आरोग्य सेविकाही पॉझिटिव्ह आढळली होती आणि आता दोन डॉक्टर पॉझिटिव्ह झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी आता डेंजर झोन बनत आहे, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Web Title: Number of corona positive patients in Karjat taluka 27