नुबैरशाह शेखचे विक्र मी १२ वे राज्य अजिंक्यपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:18 IST2017-08-02T02:18:21+5:302017-08-02T02:18:21+5:30
पुणे येथे झालेल्या १९ वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत अव्वल स्थान राखूनआंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाहने विक्र मी १२ वे राज्य अजिंक्यपद आपले नावे केले.

नुबैरशाह शेखचे विक्र मी १२ वे राज्य अजिंक्यपद
ठाणे : पुणे येथे झालेल्या १९ वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत अव्वल स्थान राखूनआंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाहने विक्र मी १२ वे राज्य अजिंक्यपद आपले नावे केले. त्याचे हे तिसरे विजेतेपद आहे.
पुणे वायएमसीए आयोजित राज्य निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेत नुबैरशाहने नऊ फेरींंमध्ये नऊ गुण मिळवले. या स्पर्धेतील आठव्या फेरीतच त्याने आपले विजेतेपद निश्चित केले होते. शेवटच्या नवव्या फेरीत यजमान संघटनेच्या दिगंबर जाईल याला पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसºया स्थानावर राहिलेल्या जाईल आणि नुबैरशाहमध्ये ३ गुणांचा फरक होता.