आता पाच दिवसांचा आठवडा
By Admin | Updated: April 27, 2017 00:00 IST2017-04-27T00:00:09+5:302017-04-27T00:00:09+5:30
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास शासन अनुकूल असून कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांनादेखील

आता पाच दिवसांचा आठवडा
ठाणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास शासन अनुकूल असून कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांनादेखील ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती मंगळवारी संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे आणि सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली.
अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ठाणे नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना भाटकर यांनी देशातील अनेक राज्यांनी पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना स्वीकारली आहे. ९ राज्यांनी ती प्रत्यक्ष अमलात आणली आहे.
२१ एप्रिल रोजी संघटनेस यासंदर्भातले मुख्यमंत्र्यांचे पत्रही प्राप्त झाले आहे. याची चाचपणी सुरू आहे. याशिवाय, सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे राज्यासाठीही १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असून बक्षी समितीचा अहवाल मिळाला की, कार्यवाही होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)