शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:36 IST

पुणे शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र वाढल्याचे एरवी ऐकायला मिळतच असते; हे गुन्हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगार करतात हेसुद्धा नेहमी ऐकिवात येते.

पुणे : पुणे शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र वाढल्याचे एरवी ऐकायला मिळतच असते; हे गुन्हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगार करतात हेसुद्धा नेहमी ऐकिवात येते. मात्र, आता थेट ‘बांगलादेशी’ घुसखोर पुण्यामध्ये घरफोड्या करू लागल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सिंहगड रस्ता भागात झालेली एक घरफोडी उघडकीस आणली असून, त्या बांगलादेशी तरुणांना गजाआड करण्यात आले आहे.इदानूर रहेमान राकिब (वय ६२), जाकीर कोबिद हुसेन (वय ४२, दोघेही रा. संतोषनगर, कात्रज, मूळ बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राकिब व हुसेन हे दोघेही बांगलादेशामधील ढाका जिल्ह्यातील सारोकिया हाजीपाडा येथील राहणारे आहेत. आरोपींकडून सिंहगड रस्ता आणि सहकारनगर येथील प्रत्येकी एक आणि बिबवेवाडीतील दोन, असे चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ९ लाख ७७ हजारांचे सोने व रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकिब हा व्हिसा न घेताच बेकायदेशीरपणे भारतात आलेला आहे. तर, हुसेन एक महिन्याच्या टुरिस्ट (पर्यटन) व्हिसावर भारतात आलेला आहे. मात्र, हुसेन परत मायदेशी न जाता येथेच बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होते.सिंहगड रस्त्यावरच्या सन युनिव्हर्स या सोसायटीमध्ये २१ नोव्हेंबर रोजी फिर्यादी विद्या बोरा यांचा फ्लॅट फोडून आरोपींनी ३७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली होती. यासोबतच सुरक्षारक्षकाकडेही चौकशी करण्यात आलेली होती. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचनाही दिलेल्या होत्या. हे आरोपी चोरी केल्यानंतर सहा आसनी रिक्षातून कात्रजला गेल्याचे सीसीटीव्हीवरून निष्पन्न झाले होते. पोलिसांनी कात्रज, संतोषनगर, आंबेगाव भागात वेगवेगळ्या पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू केला असता संतोषनगर भागात राहिब पोलीस कर्मचारी अनिरुद्ध सावर्डे यांना दिसून आला.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी पथकासह जाऊन त्यालाताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हुसेनलाही अटक करण्यात आली. दोघांकडून घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.घरमालकही दोषी : करार केला नाहीबांगलादेशातून पुण्यात आल्यानंतर हे दोघेही चोरीचे गुन्हे करीत आहेत. त्यांना २०१५मध्ये चंदननगर पोलिसांनी अटक केली होती. त्याही वेळी त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले होते. या गुन्ह्यात जून २०१७मध्ये जामीन मिळाल्यानंतर त्यांना बांगलादेशात धाडण्यात आले होते. त्यानंतर १२ जून २०१७ रोजी आरोपी परत पुण्यातील कोंढवा परिसरात चोरी करताना पकडले गेले. अवघ्या नऊच दिवसांत ते परत पुण्यात आले. विविध गुन्ह्यांत पकडले गेल्यानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर त्यांनी घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. आरोपी हे भारतात आले कसे, याचा तपास करण्यात येत आहे. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हा