शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:52 IST

बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे महापालिकेत राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकतीच केली. अधिसूचनेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे स्पष्ट करत केडीएमसी प्रशासनाने सध्या तरी चुप्पी साधली असली तरी आता या बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मागील पाच वर्षे सुरू असलेल्या २७ गावे वगळण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, २७ मधील १८ गावेच वगळली आणि नऊ गावे महापालिके त शहरीकरण झाल्याच्या मुद्द्यावर जैसे थे ठेवली. या मुद्द्यावर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, त्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे.राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता केडीएमसीत किती प्रभाग असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करीत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ई वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग आय वॉर्डमध्ये होते; परंतु आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा आय वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल तर ई वॉर्डातील गावे महापालिकेत कायम राहिल्याने तो वॉर्ड महापालिकेत कायम राहील.केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे तसेच नऊ गावे महापालिकेत राहिल्याने आता लोकसंख्या साडेतेरा लाखांपर्यंत राहील, असे जाणकारांचे मत आहे. महसुली हद्दीनुसार ही गावे वगळली आहेत; परंतु जी नऊ गावे महापालिकेत राहिली आहेत, त्यांचे आठ प्रभाग होतील.विशेष बाब म्हणजे जे आठ प्रभाग आहेत, त्यात वगळलेल्या गावांचेही काही भाग आहेत. १२ लाख लोकसंख्येला ११५ प्रभाग त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्र आणि महापालिकेत राहिलेल्या गावातील लोकसंख्येचा आढावा घेता साधारण ११८ पर्यंत प्रभाग राहतील.निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीतकेडीएमसीत २७ गावांचा समावेश होण्यापूर्वी महापालिकेचे १०१ प्रभाग होते. जून २०१५ मध्ये गावांचा समावेश झाल्यावर प्रभागांची संख्या १२२ इतकी झाली होती. त्या तुलनेत चार प्रभाग कमी झाले असले तरी महापालिकेच्या मूळ १०१ प्रभागांच्या संख्येत मात्र सरकारच्या निर्णयामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूक