शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘त्या’ कामगारांना बजावल्या नोटिसा; हजर झाल्यावर मागवणार खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:53 PM

सतत गैरहजर राहत असलेल्या ४७ कामगारांचा प्रश्न एका वर्षांपूर्वी ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन उपायुक्त संतोष देहरकर यांनी कामगारांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला होता. 

उल्हासनगर : थांगपत्ता लागत नसलेल्या २६ कामगारांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासनावर वृत्तपत्रात नोटिसा प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. हे कामगार हजर झाल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा व माहिती घेऊन कामावर हजर करून घेण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.उल्हासनगर महापालिकेत वर्ग १ व २ चे ८० टक्के तर वर्ग ३ व ४ ची ४० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने कामाचा ताण वाढत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दिली. सतत गैरहजर राहत असलेल्या ४७ कामगारांचा प्रश्न एका वर्षांपूर्वी ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन उपायुक्त संतोष देहरकर यांनी कामगारांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला होता. त्यापैकी काही कामगारांनी खुलासा व माहिती दिल्यावर त्यांना तसेच काहींच्या वारसाहक्कांना नियमानुसार सेवेत रुजू करून घेतले. यामध्ये कामगार संघटनेने महत्त्वाची भूमिका वठविली. मात्र, राहिलेल्या २६ कामगारांचा प्रश्न अद्याप तसाच असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी दिली. या कामगारांचे खुलासे घेऊन नंतर त्यांना कामावर घेण्याची मागणी केली.उपायुक्त नाईकवाडे यांनी विभागामार्फत सतत राहत असलेल्या २६ कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवून खुलासा मागितला. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे उघड झाले. अखेर त्यांना महापालिका सेवेतून कमी का करू नये? अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यांच्या नोकऱ्या राहण्यासाठी वृत्तपत्रात त्यांच्याविरोधात नोटिसा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.