शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या आंदोलनानंतर ठाण्यातील युनिव्हर्सल, रेन्बो, न्यू होरायझन, लोकपुरम शाळांना शिक्षणाधिकार्‍यांची नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 16:41 IST

निद्रिस्त 'शिक्षण विभाग' मनसेच्या आंदोलनाने जागा झाला.

ठळक मुद्देनिद्रिस्त 'शिक्षण विभाग' मनसेच्या आंदोलनाने जागा झालाठाण्यातील युनिव्हर्सल, रेन्बो, न्यू होरायझन, लोकपुरम शाळांना शिक्षणाधिकार्‍यांची नोटिस - मनमानी फी वसुली केल्यास दिला कारवाईचा इशारा

ठाणे : कोरोनाकाळात नोकर्‍या गमावलेल्या पालकांकडून बळजबरी जाचक फी वसूल करणार्‍या शाळांप्रश्नी मनसेने शिक्षणधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या देत आंदोलन करुन निद्रिस्त प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिमा महाराष्ट्र सैनिकांनी भेट दिली होती. या आंदोलनाला दोन आठवडे उलटत नाही, तोच शिक्षणाधिकार्‍यांची मनमानी फी वसुली करणार्‍या युनिव्हर्सल, रेन्बो, न्यू होरायझन, लोकपुरम शाळांना नोटीस बजावली आहे. कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब पालकांकडून जबरदस्ती फी वसूल न करण्याचे आदेश दिले असून या कारवाईने पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे.

लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असून आॅनलाईन वर्ग सुरु आहेत. माञ तरीही खासगी शाळा पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत. या प्रश्नी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील सतत शिक्षणधिकारी शेषराव बडे यांच्यासोबत पञव्यव्हार करत होते. तर खासगी शाळांच्या पालकांच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. त्यामुळे याप्रश्नी शिक्षण विभाग ठोस कारवाई करत नसल्याने  मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील व मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या कार्यालयात दोन आठवड्यापूर्वी पालकांसह ठिय्या मांडला. शिक्षण विभाग झोपला असून मनसेने बडे यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली. यावेळी पुढील १५ दिवसात शाळा आणि शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन प्रत्येक शाळांबाहेर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला होता. त्यामुळे धाबे दणाणलेल्या शिक्षण विभागाने ठाण्यातील युनिव्हर्सल, रेन्बो, न्यू होरायझन, लोकपुरम या शाळांना नोटीस बजावली. या शाळांचे प्रमुख व विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आदींना हे कारवाईचे पञ पाठवले असून अशी कारवाई ठाण्यातील इतर मुजोर शाळांवर होईल असा विश्वास शहराध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केला.------------------------------------------------

लाॅकडाऊन काळात पालकांना फी भरण्यास अडचणी आहेत. त्यामुळे फी न भरल्यास कोणत्याही मुलाला आॅनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नका. याबाबत पालक - शिक्षक संघात मंजुरी घेऊन फी कमी करण्याचा योग्य निर्णय घ्यावा, असेही शिक्षणाधिकार्‍यांनी या आदेशात नमुद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणMNSमनसे