मनमानी फी घेणाऱ्या शाळांना नोटीस; फी कमी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:59 PM2020-07-23T23:59:23+5:302020-07-23T23:59:27+5:30

इतर शाळांवरही कारवाई

Notice to schools charging arbitrary fees; Order to reduce fees | मनमानी फी घेणाऱ्या शाळांना नोटीस; फी कमी करण्याचे आदेश

मनमानी फी घेणाऱ्या शाळांना नोटीस; फी कमी करण्याचे आदेश

Next

ठाणे : कोरोनाकाळात नोकºया गमावलेल्या पालकांकडून बळजबरीने फी वसूल करणाºया ठाणे शहरातील युनिव्हर्सल, रेन्बो, न्यू होरायझन, लोकपुरम या शाळांनाशिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून, कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब पालकांकडून जबरदस्तीने फी वसूल करू नये, असे बजावले आहे. शिक्षण अधिकाºयांच्या या कारवाईने पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शाळांकडून वसूल करण्यात येणाºया फी वसुलीप्रश्नी मनसेने शिक्षणाधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून निद्रिस्त प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली होती. या आंदोलनाला दोन आठवडे उलटत नाही, तोच शिक्षणाधिकाºयांनी अशा शाळांना उपरोक्त नोटिसा बजावल्या आहेत.

मनविसेने केले होते आंदोलन

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असून आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. मात्र, तरीही खासगी शाळा पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत. याप्रश्नी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील, शिक्षणधिकारी शेषराव बडे यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता. तसेच पाटील व मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी बडे यांच्या कार्यालयात दोन आठवड्यापूर्वी पालकांसह ठिय्या मांडून पुढील १५ दिवसांत शाळा आणि शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन प्रत्येक शाळेबाहेर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर, शिक्षण विभागाने ठाण्यातील उपरोक्त शाळांना नोटीस बजावली. या शाळांचे प्रमुख व विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आदींना हे कारवाईचे पत्र पाठवले असून अशी कारवाई ठाण्यातील इतर मुजोर शाळांवर होईल, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: Notice to schools charging arbitrary fees; Order to reduce fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.