शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘नोटा’ने बिघडविले दोन विद्यमान आमदारांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:21 IST

कलानींसह रूपेश म्हात्रेंना फटका; नोटाला ७५,१२९ मतदान

ठाणे : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारराजाने आपला कौल अखेर दिला आहे. या निकालाने अनेकांची आधीच दिवाळी साजरी झाली, तर काहींचे मात्र दिवाळे निघाले आहे. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ती म्हणजे या उमेदवारांपैकी कोणी नाही अर्थात ‘नोटा’ हेच बटण दाबून राज्यातील अनेक विद्यमान आमदारांना पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विद्यमान दोन आमदारांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारी जिल्ह्यात मतपेट्या उघडण्यात आल्या. त्यानंतर, दिवाळीआधीच कुठे रॉकेट उडाले, तर कुठे अ‍ॅटमबॉम्ब फुटले. यामुळे कुठे आनंदाचे तर कुठे दु:खाचे वातावरण होते. तर, कुठे ठासून नाही तर घासून आलो, अशी परिस्थिती होती. ठाणे जिल्ह्यात मतदारराजाने आपले कर्तव्य पार पाडले असून सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे नोटांचा वापर करणाऱ्या मतदारांनी. कारण, या नोटा मतांमुळे ठाणे जिल्ह्यात दोन आमदारांना आपली आमदारकी गमवावी लागली आहे.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त नोटा मते पडली, ती मुरबाड मतदारसंघात. इथे तब्बल सहा हजार ७८३ नोटा मते पडली आहेत. तर, कल्याण ग्रामीण मतदारसंघात सहा हजार ८२ नोटा मते पडली आहेत. सर्वात कमी भिवंडी पूर्व मतदारसंघात एक हजार ३५८ नोटा मतदान झाले आहे. परंतु, या नोटा मतदारांमुळे भिवंडी पूर्वेचे शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे आणि उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांना फटका बसल्याचे चित्र आहे. रूपेश म्हात्रे हे एक हजार ३१४ मतांनी पराभूत झाले. त्याठिकाणी एक हजार ३५८ नोटा मतदान झाले आहे. तर, ज्योती कलानी या दोन हजार चार मतांनी पराभूत झाल्या. इथे चार हजार ९७८ नोटा मतदान झाले आहे. एकूणच नोटा मतदारांची संख्या ही मागील काही वर्षांत निवडणुकीत महत्त्वाचा वाटा उचलत असल्याचेच या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

‘नोटा’चे झालेले मतदारसंघनिहाय मतदान

भिवंडी ग्रामीण : तीन हजार ३४०शहापूर : चार हजार ३१३मुरबाड : सहा हजार ७८३कल्याण पश्चिम : तीन हजार २६४भिवंडी पूर्व : एक हजार ३५८भिवंडी पश्चिम : एक हजार ८८६अंबरनाथ : चार हजार ३२२उल्हासनगर : चार हजार ९७८कल्याण पूर्व : तीन हजार ६९०डोंबिवली : चार हजार १३४कोपरी-पाचपाखाडी : पाच हजार १४७ओवळा-माजिवडा :सहा हजार ०५४मीरा-भार्इंदर : दोन हजार ६२३कल्याण ग्रामीण :सहा हजार ०८२ठाणे शहर : पाच हजार ५४७मुंब्रा-कळवा : दोन हजार ५९१ऐरोली : पाच हजार २१३बेलापूर : तीन हजार ८०४ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत एकूण ७५ हजार १२९ नोटा मतदान झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक