शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

ठाणे जिल्ह्यातील महापालिकाच नव्हे तर ग्रामीण जिल्हाही राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:40 PM

ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही.

ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. यास्तव ठाणे जिल्ह्यातीलुसर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात दि. 2 जुलै  रोजी रात्री 12.00 वाजेपासून दि. 11जुलै 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  लागु केले आहेत. 

शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी लॉकडाऊन उद्घोषणेद्वारे  मार्गदर्शक सूचना, आदेश लागु केले आहेत. तसेच सदरच्या लॉकडाऊन आदेशांना वेळोवेळी मुदतवाढ दिलेली आहे.

मिशन बिगीन अगेन च्या आदेशांना दि. 31जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  सदर आदेशानुसार साथ रोगाचा प्रसार नियंत्रणात आणणेकामी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे व विशिष्ट क्षेत्रात प्रतिबंध लागू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आलेले आहेत.  

तथापि, ठाणे जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.  मिशन बिगीन अगेन आदेशानुसार अनेक प्रकारच्या सवलती सुरु झाल्याने रस्ते, बाजार परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे.  उपरोक्त पार्श्वभुमीवर  लॉकडाऊनचे प्रतिबंध पुन्हा लागू करणे आवश्यक  झाले आहे.

ठाणे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र (म.न.पा. आयुक्त कार्यक्षेत्र) वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. महानगरपालिकांच्या हददींमध्ये सदर आदेश लागू असणार नाहीत. तेथे संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी काढलेले लॉकडाऊनचे आदेश लागू राहतील.  

• सदर आदेशानुसार ठाणे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात सर्व प्रकारच्या बाजारपेठा, सर्व दुकाने व खाजगी आस्थापना [अत्यावश्यक किराणा सामान (Grocery), जीवनावश्यक वस्तू (Essential commodities) व औषधांची दुकाने (Chemist Shops) तसेच टेक अवे/ पार्सल सर्व्हिस रेस्टॉरंट आणि वाईनशॉप वगळून सकाळी 9.00 ते सायं. 05.00 वा.पर्यंत] उपरोक्त नमुद कालावधीत पुर्णपणे बंद ठेवण्याचे याद्वारे आदेशित करण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात सर्व ठिकाणी किराणा, औषधे, भाजीपाला, फळे, बेकरी व दुध इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची विक्री व वाहतूक सुरु ठेवणेत येईल

औषधे व जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक आणि माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंदी लागू करणेत येत आहे. अधिकृत प्रवास परवाना / ई-पास धारक वाहनांची वाहतूक सुरु राहील.• अत्यावश्यक सेवेत कार्यरत शासकीय/निमशासकीय कर्मचारी वर्ग संबंधित कार्यालयात पोहचवणे यासाठी सर्व प्रकारची वाहतूक सूरु राहील.• खाजगी वाहनांचा उपयोग अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा व सुविधांसाठी (चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती) करता येईल. टॅक्सी सेवा (चालकाव्यतिरिक्त दोन व्यक्ती), रिक्षा सेवा (चालकाव्यतिरिक्त एक व्यक्ती) व दुचाकी प्रवास (फक्त एक व्यक्ती) या आदेशात नमुद बाबींकरीताच फक्त चालू ठेवण्यात येतील. तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी वाहतूक चालू ठेवता येईल.• प्रसारमाध्यमांची वाहने/बँका, एटीएम व त्याना सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/टेलिफोन व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/ हॉस्पिटल्स व त्यांना सेवा पुरविणाऱ्या आस्थापना/अत्यावश्यक सेवेसाठी पुरक आयटी सेवा/पेट्रोलपंप, वीज (Electricity) व्यवस्था यासाठीची सर्व वाहतूक चालू राहील.• सर्व नागरिकांनी पूर्ण वेळ घरी राहणेचे आहे. केवळ तातडीच्या कारणांसाठी नागरीकांना बाहेर पडता येईल व त्यावेळी प्रत्येक दोन  व्यक्तीमधील अंतर किमान 6 फुट असणे आवश्यक आहे.• पाचपेक्षा अधिक लोकांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असेल.• सर्व प्रकारची दुकाने, वाणिज्य आस्थापना, खाजगी कार्यालये आणि कारखाने, वर्कशॉप, गोदामे इत्यादी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, अखंडीत प्रक्रिया (Continuous Process) आवश्यक असलेले आणि औषधांची निर्मिती करणारे कारखाने, API इत्यादी चालू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने जसे की, डाळ आणि राईस मिल, अन्न प्रक्रिया, दुग्ध उत्पादने, पशुखाद्य निर्मीती व त्यानुषांगिक कारखाने  व आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी राहील.• शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी शासन आदेश दिनांक 29/06/2020 मधील सूचनांप्रमाणे आवश्यक मनुष्यबळ कार्यरत ठेवावे, साहित्याची वाहतूक सुरू ठेवावी व आपले कर्मचाऱ्यांची वाहतुक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी.   खालीलप्रमाणे जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारे दुकाने व आस्थापना निर्बंधामधून वगळणेत येत आहेत.a) दवाखाने, फार्मसी, चष्म्याची दुकाने, औषधे इत्यांदीची निर्मिती करणारे तसेच पुरवठादार व त्यासाठीची साठवणूकीची गोदामे व वाहतूकसेवाb) बँक, एटीएम, विमा सेवा, FinTech Services आणि तद्नुषंगिक सर्व कामकाज.c) वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे.d) IT आणि  ITeS, दुरसंचारसेवा, टपालसेवा, इंटरनेटसेवा आणि डेटा सर्व्हिसेस.e) जीवनावश्यक (Essential commodities) वस्तूंची वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था (Supply Chain) व जीवनावश्यक वस्तुंच्या साठवणूकीची गोदामे.f) अन्नधान्य आणि तद्नुषांगिक माल यांची आयात व निर्यात सेवा.g) ई-कॉमर्सद्वारे घरपोच पुरविणेत येणारी अन्न, औषधे आणि वैद्यकीय साहित्य सेवा.h) अन्नधान्य, दुध, ब्रेड व बेकरी उत्पादने, फळे, भाज्या, अंडी, मांस, मासळी यांची विक्री तसेच वाहतूक व्यवस्था आणि त्यांची साठवणूकीची गोदामे.i) बेकरी आणि पाळीव जनावरांसाठी पशुवैद्यकीय सेवा-सुविधा.j) पार्सल / घरपोच सेवा देणारी रेस्टॉरंट्स.k) पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज तसेच त्यांची गोदामे आणि त्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था.l) अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व संस्थांना/कार्यालयांना सुरक्षा पुरविणाऱ्या व सुविधा   देणा-या सेवा (खाजगी कंत्राटदारासह).m) कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखणेसाठी तसेच अत्यावश्यक सेवांना मदत आणि सेवा पुरविणा-या खाजगी आस्थापना.n) वरील सर्व बाबींसाठी आवश्यक असणारी (Supply Chain) व्यवस्था.o) शेतीची सर्व कामे सुरळीत चालू राहतील त्यास कोणाताही अटकाव असणार नाही. शेतीशी संबंधीत खते, बि-बियाणे, औषधे यांची सर्व दुकाने व  वाहतूक सुरु राहतील.

प्रस्तुतचे आदेश हे केवळ तत्वत: लोकांची हालचाल/प्रवास प्रतिबंधित करणेसाठी असून, वस्तू व सेवांवर प्रतिबंध लादणेसाठी नाहीत. ही बाब सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी जाणीवपूर्वक विचारात घ्यावयाची आहे. ​वरील  आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिला आहे.