शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"ठेकेदारच नाही तर रस्त्यांची गुणवत्ता तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई", एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:20 IST

Thane Road News: यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर रस्ते आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणा-या अधिका-यांवरही कारवाईचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील खड्डयांची पाहणी दौ-यात दिले.

ठाणे - पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त झाले. खड्डेही भरले. मग ते पुन्हा का उखडले? पाऊस आला की रस्ते उखडले, हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर रस्ते आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणा-या अधिका-यांवरही कारवाईचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील खड्डयांची पाहणी दौ-यात दिले.

ठाण्यातून जाणा:या मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवरील खड्डयांमुळे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही गुरुवारी बसला. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरांसाठी दोन ते अडीच तासांचा अवधी लागत असल्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही टीकेची झोड उठवून आंदोलनाचा इशारा दिला. या सर्वच घटनांची गांभीर्याने दखल घेऊन शिंदे यांनी ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पाहणी दौरा केला. याच दौ:यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, एसएसआरडीसी, एमएमआरडीए तसेच मेट्रोचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून कामे करतांना गुणवत्ता राखली पाहिजे. जर एखादा ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असेल तर त्याला काळ्या यादीत टाका. पैसे घेऊन कामे निकृष्ट होणार असतील तर खपवून घेतले जाणार नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. काळ सोकावता कामा नये. पावसाळ्यापूर्वी कामे होऊनही पावसानंतर रस्ते उखडले कसे? त्याची गुणवत्ता, डांबराचे प्रमाण, तापमान हे सर्वच चांगल्या प्रकारे तपासले गेले पाहिजे. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर अधिका:यांनाही जबाबदार धरून कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. आनंदनगर येथे तब्बल पाऊणतास स्पॉटवरच अधिका:यांची शाळा घेतल्यानंतर शिंदे पुढे पाहणीसाठी भिवंडीकडे रवाना झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेroad transportरस्ते वाहतूक