शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे वेगळ सांगायला नको - खासदार कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:59 IST

माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो.

डोंबिवली: माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. यातूनच लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे स्पष्ट होत असल्याची अशी बोचरी टीका खासदार श्रीकांत शिंदेंचे नाव ने घेता भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी केली. एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणाले की, कल्याण -डोंबिवलीत येणा-या मेट्रोचे श्रेय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित दिलखुलास संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणमध्ये शनिवारी हा उपक्रम संपन्न झाला. त्यावेळी खा. शिंदेंना त्यांनी टोला लगावला. आपल्या मतदारसंघात लोढा यांचा प्रकल्प नसल्याचे मी जबाबदारीने सांगतोय असेही पाटील म्हणाले. जर एखादे चांगले काम झाले तर आमच्यामुळे आणि वाईट गोष्ट झाली तर ती भाजपामुळे, हे कसल यांचे राजकारण? असा सवाल करीत सत्ताधारी म्हणून चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी शिवसेनेवर टिका केली. याठिकाणी ज्याप्रकारचे राजकारण होते तसे अन्यत्र कुठेही केले जात नाही. शहराच्या विकासकामांमध्ये तरी राजकारण करू नये. त्यामूळे शहर विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मागे पडल्याची खंत व्यक्त करीत आपण शिवसेनेबरोबर याबाबत कोणत्याही वेळी चचेर्साठी तयार आहोत असं खुले आवाहन पाटील यांनी केले.त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले की ते आज जे आहेत ते त्यांच्या वडिलांमुळे. त्यांनी जे संस्कार केले त्यामूळेच आपण इथपर्यंतच प्रवास करू शकल्याचे ते आवर्जून म्हणाले. पाटील यांनी त्यांची कौटुंबिक जडण घडण, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंतचा प्रवास, मतदारसंघातील विकासकामे-नागरी प्रश्न, समस्या, नको तितक्या राजकारणामूळे ठाणे जिल्ह्याची झालेली पीछेहाट, भविष्यातील राजकीय प्रवास आदी महत्वाच्या विषयांवर मनमोकळेपणे मतं व्यक्त केली.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाBJPभाजपा