शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये म्हणून ठाण्यातील मुख्याध्यापिकेचे सेवापुस्तकच चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:57 IST

ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापिकेला सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत म्हणून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष भाऊ किरण ठाणेकरसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देनऊ महिन्यांपासून मुख्याध्यापिकेचा पाठपुरावा संस्थाध्यक्ष भावाचाच ‘प्रताप’मालमत्तेच्या वादातून राग काढल्याचा आरोप

ठाणे : मुख्याध्यापिका ज्योती ठाणेकर (५८) यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळू नयेत, यासाठी शाळेतील त्यांच्या कपाटातून सेवापुस्तिकेसह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी करणारा संस्थाध्यक्ष असलेला त्यांचा भाऊ किरण ठाणेकर आणि भावजयीसह चौघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. मालमत्तेच्या वादातून भावाने हा राग काढल्याचा आरोप ज्योती यांनी पोलिसांकडे केला.ठाणे पूर्वेतील कोपरी येथील ठाणेकरवाडीतील हुतात्मा मारुतीकुमार एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शाळेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९० पासून ज्योती ठाणेकर या मुख्याध्यापक म्हणून नोकरीला लागल्या. त्याच संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २८ वर्षांच्या सेवेनंतर त्या ३१ मार्च २०१८ रोजी सेवेतून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळण्यासाठी संस्थेकडून सेवापुस्तिका आणि इतर कागदपत्रे ठाण्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात सहा महिन्यांपूर्वीच मिळणे अपेक्षित होते. पण, त्याचकाळात ती २८ जून २०१७ ला सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान शाळेतील त्यांच्याच कपाटातून चोरण्यात आली. बनावट चावीच्या आधारे त्यांचा भाऊ तथा संस्थेचा अध्यक्ष किरण ठाणेकर, दुसरा भाऊ दीपक ठाणेकर, किरण याची पत्नी स्रेहा ठाणेकर आणि सुचिता डबरी यांनी ती चोरल्याचा ज्योती ठाणेकर यांचा आरोप आहे. जून २०१७ पासून त्यांनी याबाबत सतत पाठपुरावा करूनही त्यांना त्यांच्याच भावांनी दाद न दिल्याने अखेर याप्रकरणी त्यांनी निवृत्तीच्याच दिवशी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर हे चौघेही पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘‘संस्थेचे अध्यक्ष किरण ठाणेकर यांच्याशी माझा मालमत्तेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शाळेच्या एका बैठकीतच त्यांनी हा वाद उकरून काढला होता. याच रागातून त्यांनी सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, म्हणून माझी सेवापुस्तिका आणि इतर कागदपत्रे शाळेतील कपाटातून चोरून नेली.’’- ज्योती ठाणेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, हुतात्मा मारुतीकुमार विद्यालय, कोपरी

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाtheftचोरी