शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

प्रायोजक नसल्याने हंडी टांगलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:01 IST

थरांबाबत गोविंदा पथकांना दिलासा देणारा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाºया गोविंदा पथकांच्या संख्येत घट झाली आहे. उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला, तरी गोविंदा पथकांना पुरेसे प्रायोजक मिळत नसल्याने यंदा अनेक गोविंदा पथकांनी माघार घेतल्याचे दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : थरांबाबत गोविंदा पथकांना दिलासा देणारा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाºया गोविंदा पथकांच्या संख्येत घट झाली आहे. उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला, तरी गोविंदा पथकांना पुरेसे प्रायोजक मिळत नसल्याने यंदा अनेक गोविंदा पथकांनी माघार घेतल्याचे दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.दोन वर्षांपासून आयोजकांची घटलेली संख्या आणि यंदा गोविंदा पथकांना मिळत नसलेले प्रायोजकत्व यामुळे यावर्षीच्या उत्सवात जवळपास १२५ ते १३० गोविंदा पथकेच सहभागी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी २०० गोविंदा पथकांनी उत्सवात उतरण्याची तयारी दाखविली होती. परंतु मोजकेच दिवस राहिल्याने आणि प्रायोजक मिळणे कठीण झाल्याने बहुतांश पथकांनी माघार घेतल्याची नाराजी महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी महापालिकेच्या निवडणुकीमुळे गोविंदा पथकांना प्रायोजकत्व मिळाले होते. त्यामुळे जवळपास १६० गोविंदा पथके उतरली होती. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. दरवर्षी उत्सवात सहभागी होणारी बहुतांश गोविंदा पथके प्रायोजकत्वाच्या शोधात आहेत. भोजन, प्रवास, टी शर्ट, विमा आदींचा खर्च पथकांना करावा लागतो. पाच ते सहा थर लावणाºया पथकाला किमान सव्वा लाख ते दीड लाख खर्च आणि त्यापेक्षा अधिक थर लावणाºया गोविंदा पथकांचा खर्च अडीच लाखांवर जातो. प्रायोजकांची वानवा असल्याने पथकाचा खर्च भागणार कसा, असा सवाल गोविंदा पथकांपुढे ठाकला. खर्चाचे गणित सुटत नसल्याने बहुतांश गोविंदा पथकांनी यंदा उत्सवात न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

भोजनाची व्यवस्थागोविंदा पथकांवरील खर्चाचा एक भार कमी करण्यासाठी ठाणे-मुंबईतील गोविंदा पथकांसाठी ओम साईराज अन्नछत्र मित्र मंडळाने भोजनाची व्यवस्था केली आहे. घोडबंदर रोडवरील सरस्वती शाळेसमोरील आनंदनगरच्या क्रिश प्लाझा येथे सकाळी ११ वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही भोजनाची व्यवस्था असेल.

जीएसटीमुळे टी शर्ट महागदरवर्षी मंडळांच्या टी शर्टच्या संख्येत वाढ होत असते. परंतु यंदा जीएसटीमुळे टी शर्टच्या किंमतीही वाढल्या आहेत आणि याचा अतिरिक्त भार गोविंदा पथकांवर येणार आहे. त्यामुळे टी शर्टचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्नही त्यांना सतावतो आहे.