शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Video : 'राज ठाकरेंना 'हे कृत्य' आवडणार नाही, असं काहीही करू नका' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 10:28 IST

प्रवीण चौगुले असे मृत युवकाचे नाव असून तो ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता.

ठळक मुद्देप्रवीण चौगुले असे मृत युवकाचे नाव असून तो ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच, कळव्यातील रुग्णालयात धाव घेतली.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी जाहीर आवाहन करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कुणीही माझ्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर एकत्र येऊ नये, असेही राज यांनी म्हटले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील एका मनसैनिकाने आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

प्रवीण चौगुले असे मृत युवकाचे नाव असून तो ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. तसेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे त्याने आपल्या निकटच्या मित्रांना सांगितले होते. त्यानंतर, मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. 

ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच, कळव्यातील रुग्णालयात धाव घेतली. ''ज्यावेळी मला समजलं तसं मी इकडे धावत आलो, तो 85 टक्के भाजला आहे. मी त्याच्या मित्रांशी बोललो, त्यावेळी राज ठाकरेंच्या ईडीप्रकरणामुळे माझी घुसमट होत असल्याचे त्याने म्हटले होते आज दिवसभर तो, याच विचारात होता. हा प्रकार जर याच घटनेमुळे घडला असेल तर, ही खेदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांना, राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन की, कुणीही असं कुठलंही कृत्य करू नका. राज ठाकरेंना हे कृत्य कधीही आवडणार नाही. ते या कृत्याला कधीही दुजोरा देणार नाहीत. त्यामुळे कुणीही असे कृत्य करू नये,'' असे आवाहन ठाणे अविनाश जाधव यांनी केलं आहे. 

तसेच, आत्महत्या केलेल्या मनसैनिकाला आई-वडिल नसून केवळ एक बहिण आहे. त्याच्या आईचाही जळून मृत्यू झाला होता. तर, वडीलही हयात नाहीत. तसेच, त्याच्या बहिणीशी आमचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे, मृत्यूनंतरचे इतर सर्व सोपस्कर आम्हीच पार पाडणार आहोत, असेही जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी आत्महत्येचे कारण माहित नसून तपास सुरू आहे, असे म्हटले आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या 

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस; मानसिक तणावातून मनसैनिकाने स्वत:ला पेटवून घेतलं!

पी. चिदम्बरम अडचणीत; कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता

पक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे

इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’

टॅग्स :thaneठाणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSuicideआत्महत्या