शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून, काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 05:49 IST

मुजफ्फर हुसेन : भार्इंदर येथे काँग्रेसचे आंदोलन; जिल्ह्यातही ठिकठिकाणी आयोजन

मीरा रोड/भार्इंदर : नोटाबंदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात चुकीचा निर्णय होता. त्यामुळे सर्वसामान्यांचा नव्हे, तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. देशाचा चौकीदारच चोर असून नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा एक प्रकारे खून होता, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात केला.

नोटाबंदीच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भार्इंदर (पू.) काँग्रेस कार्यालयापासून गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. शास्त्रोक्त पद्धतीने मोदी सरकारचे श्राद्ध यावेळी घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लीला पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम, अ‍ॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदीप चौहान, प्रकाश नागणे आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही जनता, लहान उद्योजक, व्यापारी वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. त्यांची दिवाळी काळी ठरली. राफेल घोटाळा हजारो कोटींचा असून केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. चार वर्षे सत्ता असताना राम मंदिर बांधले नाही. आता निवडणूक आली की, मंदिराचा मुद्दा उभा करून सरकार तेढ वाढवत असल्याचा आरोप मुजफ्फर हुसेन यांनी यावेळी केला.शहापूरमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलनशहापूर : मोदी सरकारने देशात लागू केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली असून या फसलेल्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.या निर्णयामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर हजारो लोक बेरोजगार झाले, तर जीडीपी दरसुद्धा कमी झाला, याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने शहापूर तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना नोटाबंदीविरोधात निवेदन दिले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcongressकाँग्रेसDemonetisationनिश्चलनीकरण