शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

'कुणाचेही नागरिकत्व धोक्यात आलेले नाही; जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:36 IST

सुनील देवधर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘सीएए’वर व्यक्त केले मत

डोंबिवली : ज्या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ बोलता येत नसेल, तर ते लांच्छनास्पद आहे. सीएए आणि एनआरसी यामुळे अनेकांचे नागरिकत्व जाणार अशी बोंब मारली जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा आहे. काढून घेणारा नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे मी आधी सीएएबद्दलच बोलणार. भले मला अटक झाली तरीही चालेल, असे आव्हानच त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी दिले.

डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या २३ व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या दत्तनगर येथील शाळेच्या पटांगणात शुभारंभाच्या व्याख्यानात शुक्र वारी ते बोलत होते. भारताचे नागरिकत्व या विषयावर बोलता येत नाही, हे चालणार नाही, असा टोला देवधर यांनी महाविकास आघाडीला लगावला. कम्युनिस्ट हा भारताचा एक नंबरचा शत्रू आहे. त्रिपुरा राज्यात २५ वर्षे राष्टÑगान होऊ दिले नव्हते. तेथे भाजपचे सरकार येताच राज्याच्या अधिवेशनात राष्टÑगान झाले, असेही त्यांनी नमूद केले.

देवधर म्हणाले की इंदिरा गांधी, पंडित नेहरू, मनमोहन सिंग यांनी ‘सीएए’ची वेळोवेळी गरज व्यक्त केली, पण दिले कोणीच नाही. ते मोदी सरकारने दिले आहे. अवॉर्ड वापसीवाले लोक हे अवॉर्ड मॅनेज करणारे होते. त्यांनी पैसे स्वत:कडे ठेवले आणि केवळ कागद पाठवून दिले, अशी टीकाही त्यांनी मोदीविरोधकांवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाषणे ऐका. भारतात कोण लोक राहतात, याची नोंद असली तर काय बिघडले? एनआरसी असावे, असे कोणी सांगितले तर ते पंडित नेहरूंनी म्हटले होते. आसाममध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणण्यात आले. मोदींनी अजून कुठेही एनआरसी मांडलेले नाही.

मात्र, पाकिस्तान, बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांना येथे थांबता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी फाळणी मागितली ते आता मुंब्य्रात राहत आहेत. सीएएवर बोलण्यास मनाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुंब्य्रात काय चालले आहे, हे जरा पाहावे, असा सल्लाही देवधर यांनी दिला. देवधर यांनी उपस्थित नागरिकांना सीएएला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या नंबरवर मिसकॉल देण्याचेही आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष विलास जोशी, कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. स्वागतगीत व ईशस्तवन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. अरु णोदय माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी करिष्मा संजय काळे हिने म्हटलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्र माचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी केले. तर, आभार अरु ण ऐतवडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे नरेंद्र दांडेकर, भाई उंटवाले, वसंत देशपांडे, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नगरसेवक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थितीजेएनयूमध्ये आठ हजार विद्यार्थी शिकतात. तेथे चार हजार मतदार असून त्यातील दोन हजार मते ही अभाविपला मिळतात. तसेच अन्य हजारो मते ही कम्युनिस्टांना मिळतात. भाजपचे अनेक नेते हे जेएनयूमधून आले आहेत. काही शेकडा विद्यार्थीच गोंधळ घालत आहेत. जेएनयूला विरोध नाही. मात्र, तेथे कलाकार मंडळी हजेरी लावत आहेत, ते केवळ प्रसिद्धीसाठीच, असे देवधर यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा