शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

25 वर्षांपासून सरपंच नाही; भिवंडीतील पहारे गावच्या ग्रामविकासकामांना खीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:56 IST

नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच  प्रवास करावा लागत आहे तर पिण्याच्या पाण्याची टाकी 25 वर्षांपासून पडीक अवस्थेत आहे.

नितीन पंडित

भिवंडी-  भिवंडी तालुक्यातील पहारे गावात तब्बल गेल्या 25 वर्षांपासून सरपंच नसल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांना खीळ बसली असून गावाची दयनीय अवस्था झाली आहे. गावात एकही आदिवासी नसताना देखील 1995 मध्ये निवडणूक यंत्रणेकडून पहारे गावाला आदिवासी सरपंचपदाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र या गावात एकही आदिवासी नसल्याने सरपंचाची खुर्ची आजही  रिकामीच आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेशी वेळच्यावेळी समन्वय साधला जात नसल्याने गावातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच  प्रवास करावा लागत आहे तर पिण्याच्या पाण्याची टाकी 25 वर्षांपासून पडिक अवस्थेत आहे.गावात पाण्याची समस्या असल्याने नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेलचे विकत पाणी घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे.10 वर्षांपूर्वीची जिल्हा परिषदेची शाळा पडक्या अवस्थेत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे विजेचे खांब वाकलेले आहेत  वीजतारा तुटलेल्या अवस्थेत आहेत.गावात पथदिवे व रोडच्या कडेची गटारे सुद्धा नाहीत अशा विविध नागरी समस्या असल्याने आदिवासी सरपंच पदाचे आरक्षण हटवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून  करण्यात आली आहे.

आमच्या पहारे गावाला सरपंच नसल्याने ग्रामसेवक काम पाहतात मात्र त्यांच्याकडे दोन गावांची कामे असल्याने ते 15 दिवसांनी किंवा  महिन्याने देखील येतात त्यामुळे गावाची विकासकामे होत नाही. गावची सर्वच कामे पूर्णपणे ठप्प असल्याने गावची प्रगती होत नाही त्यासाठी शासनाने आरक्षण हटवणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पहारे गावचे पोलीस पाटील भरत भोईर यांनी दिली आहे.

तर आमच्या गावच्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. महत्वाची बाब म्हणजे 25 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधली मात्र आजपर्यंत या टाकीत पाणीच आलेले नाही त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.आमच्या गावात आदिवासी नसताना आरक्षण लादून आमच्यावर शासनाने अन्याय केला आहे त्यामुळे  शासनाने  आरक्षण हटवून आमच्या गावाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती शासनाला करतो अशी प्रतिक्रिया पहारे येथील माजी सरपंच पुंडलिक पाटील यांनी दिली आहे.