शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

येत्या चार महिन्यांत कोणतेही नवे काम घेता येणार नाही- आयुक्त पी. वेलरासू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 21:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस गेल्या पाच वर्षांत विविध कर वसुलीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पाहता 90 कोटींच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळालेले नाही.

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेस गेल्या पाच वर्षांत विविध कर वसुलीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न पाहता 90 कोटींच्या पेक्षा जास्त उत्पन्न मिळालेले नाही. उत्पन्नापेक्षा जास्तीच्या खर्चाची कामे हाती घेतली गेली. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली. यंदा 1140 कोटी रुपयांचे बजेट असून, विविध करांतून 840 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे 30 कोटी रुपयांचा तूट आहे. त्यामुळे नव्याने काम घेता येत नाही. जोपर्यंत हा 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत येत्या चार महिन्यांत नव्याने कामे घेता येणार नाही. 30 कोटी रुपये आणायचे कुठून असा प्रश्न असला तरी त्यासाठी  सरकारकडून निधी मिळविणे अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 कोटींचा निधी मिळाल्यावर ही आर्थिक कोंडी फुटणार असल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीसाठी सभा तहकुबीची सूचना मांडला होती. या सभा तहकुबीवर हळबे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केल्याविषयी सर्व पक्षीय सदस्यांनी त्यांचाच मुद्दा उचलून धरीत सदस्य  विश्वनाथ राणो, रमेश म्हात्रे, प्रकाश भोईर, प्रकाश पेणकर, दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, श्रेयस समेळ, निलेश शिंदे, छाया वाघमारे यांनी या विषयावर प्रदीर्घ चर्चा घडवून आणली. या चर्चे दरम्यान या आर्थिक कोंडीला महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच आयुक्तांनाही लक्ष्य केले. सर्व सदस्यांच्या विवेचननानंतर आयुक्त वेलरासू यांनी आर्थिक परिस्थिती का व कशामुळे उद्भवली याचा खुलासा केला. महापालिकेच्या स्मार्ट सिटी, अमृत योजना, बीएसयूपी, स्वच्छ भारत या योजनाचा हिस्सा महापालिकेस द्यायचा आहे. या चारही योजनेतील महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम 300 कोटी रुपये इतकी आहे. बजेट तयार करताना या 300 कोटी रुपयांच्या हिश्श्याचा समावेश केला गेला नाही. मात्र ही रक्कम महापालिकेस द्यायची आहे. ही रक्कम मागच्या वर्षी महापालिकेस द्यायची नव्हती. हे प्रकल्प आल्याने ही रक्कम द्यावी लागणार आहे. हा हिस्सा अर्थ संकल्पात नमूद केला असता तर ही परिस्थिती उद्धवली नसती. या व्यतिरिक्त 60 कोटी रुपये कंत्रटदाराची बिले थकली आहे. महसूली खर्च करणो सक्तीचे आहे. त्यातून कर्मचा:याचे पगार, बोनस आणि देखभाल दुरुस्तीचे काम केले जाईल. मात्र भांडवली खर्चाची कोणतीही कामे केली जाणार नाही. त्यामुळे नगरसेवकांच्या विकास कामांचा फाईल्सचा प्रवास वाढला आहे ही वस्तुस्थिती आयुक्तांनी मान्य केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका