शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान

By जितेंद्र कालेकर | Updated: August 16, 2021 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, ...

ठळक मुद्दे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलजन आशीर्वाद यात्रेला ठाण्यातून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केला. नियोजित नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, ही स्थानिक भूमीपुत्रांचीच इच्छा आणि मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.ठाणे जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. याच यात्रेचा प्रारंभ ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर ठाणे शहरातील इंदिरानगर वागळे इस्टेट, नितीन कंपनी, पाचपाखाडी मार्गे ही यात्रा मासुंदा तलाव येथे आली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, मोदी हे जनताभिमुख कारभार करीत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या भाषणावरही देशातील तरुणाईने चांगले रँकींग दिले आहे. देशाची युवा पिढी, आणि जनता मोदींचे नेतृत्व मान्य करते. राजकारणाची दिशा वेगळी करण्यासाठी देशातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदी हेच पंतप्रधान होतील, ही काळया दगडावरची रेघ आहे.* भ्रष्टाचार करणारे, चोऱ्या करणारे एकत्र आले की समजायचे राजाचा कारभार हा योग्य दिशेने चालला आहे, असे चाणक्य नितीमध्ये २५०० वर्षांपूर्वी म्हटले असल्याचा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना दिल्लीत एकत्र येत बैठक घेतल्याचा मुद्दयावर लगावला.* दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जावे, ही मागणी जरी आपण लोकसभेत २०१५ मध्ये केली असली तरी ती केवळ आपली वैयक्तिक मागणी नसून ती भूमीपूत्रांची ठाम मागणी आहे. मात्र राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून प्रस्ताव पारीत करुन वेगळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची भूमीका घेतली. दि. बांच्या नावासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत. अगदी अलिकडेही संघर्ष समितीच्या मंडळींनी दिल्लीत आपली भेट घेतली असून नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचीही भेट घेऊन त्यांनाही वस्तूस्थिती समजून सांगितल्यानंतर त्यांनीही सकारात्मक भूमीका घेतली. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या मागणीवर आपणही खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.* ठाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानेच आभार-जनतेमुळे खासदार आणि मोदींमुळे मंत्रि झालो. देशाची प्रधानमंत्र्यांची सूचना आहे की, लोकांची कामे करण्यासाठी जनआशीर्वाद घ्या. यात निवडणूकांचा काहीही संबंध नाही. ७४ वर्षांनी ठाण्याला मंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाल्यानेच आभार प्रदर्शनासाठी ही आशीर्वाद यात्रा असल्याचा दावाही पाटील यांनी यावेळी केला.* यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि अ‍ॅड. संदीप लेले यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र