उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

By सदानंद नाईक | Updated: August 21, 2023 18:02 IST2023-08-21T18:02:41+5:302023-08-21T18:02:52+5:30

३५ लेटलतीफ कर्मचाऱ्यांना समज, ठेकेदार व माजी नगरसेवकांचीही कोंडी

No entry for citizens in Ulhasnagar Municipal Corporation till 2 pm | उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडल्यानंतर पालिका प्रशासन खळबळून जागे झाले. नागरिकांना दुपारी २ पर्यन्त नो एन्ट्री असून लेटलतीफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन ३५ जणांना पाहिल्या दिवसी समज देऊन सोडण्यात आल्याची महिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिलीं आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील गोंधळी कारभाराबाबत चर्चा सुरू असताना, गेल्या आठवड्यात पालिकेच्या नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडला. त्यामुळे महापालिका एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अधिकारी वर्गाचे ७० टक्के तर वर्ग-३ व ४ पदे रिक्त असतांना, आहे त्या मनुष्यबळात शहरातील कमे करावी लागत असल्याची प्रतिक्रिया प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी देत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता उपायुक्त अशोक नाईकवाडे हे स्वतः महापालिका प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लेटलतीफ तब्बल ३५ कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र मंगळवार पासून लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. जास्त उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम नो एन्ट्री देऊन, नंतर अर्धा दिवसासाठी एन्ट्री दिली. आव जाव घर अपणा है अशी परिस्थिती महापालिकेची केल्याची प्रतिक्रिया उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे. 

महापालिका प्रवेशद्वारावर उपायुक्त नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर,महापालिका मुख्यालयात दुपारी २ वाजे पर्यंत नागरिकांना नो एन्ट्रीचे आदेश सुरक्षारक्षकांना काढला. त्यामुळे नागरिकांना दुपारी २ नंतर महापालिकेत प्रवेश मिळाला. तसेच माजी नगरसेवक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने, त्यांची कोंडी झाली. महापालिका प्रशासन खलबळून जागेतर झाले. मात्र असी कार्यपद्धती किती दिवस चालते. आदींची चर्चा आतापासूनही सुरू झाले. 

महापालिका सेवेत नगररचनाकार मुळे रुजू
वैधकीय कारणाने १५ मे पासून नगररचनाकार प्रकाश मुळे सुट्टीवर होते. त्यांच्या रजेनंतर शासनाने नगररचनाकार पदाचा प्रभारी पदभार अंबरनाथ पालिकेचे नगररचनाकार गौतमी यांच्याकडे दिले होते. शुक्रवारी ठणठणीत तब्येत झाल्यानंतर, प्रकाश रुजू होण्यासाठी महापालिकेत आले होते. मात्र त्यांना आयुक्तांना रुजू करून न घेता, राज्य शासनाचे आदेश आणण्यास सांगण्यात आले. सोमवारी शासनाचे आदेश आल्यावर, रुजू करून घेण्यात आले.

Web Title: No entry for citizens in Ulhasnagar Municipal Corporation till 2 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.