शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

एनएमएमटीचा ५० कोटींचा डेपो धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:45 IST

एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे. डेपोला लागून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून महापालिका परिवहन उपक्रमाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील काही वर्षांमध्ये बसेसची स्वच्छता व फेºयांमध्ये सुधारणा झाली असली तरी त्याचा उत्पन्नवाढीवर फारसा उपयोग झालेला नाही. तिकिटांपेक्षा इतर स्रोत वाढविण्याकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिलेले नाही. शहरातील डेपोचा योग्यपद्धतीने वापर केला जात नसून त्यामध्ये महापे बसडेपोचा समावेश आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये २ लाखपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. कामगारांसाठी वाहतुकीची फारशी साधने नाहीत. यामुळे एनएमएमटी, केडीएमटीच्या बसेसच्या माध्यमातून कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. एमआयडीसी परिसरामध्ये मध्यवर्ती डेपो असावा यासाठी पालिका प्रशासनाने पाठपुरावा करून महापे पोलीस चौकीजवळ विस्तीर्ण भूखंड एमआयडीसीकडून मिळविला आहे.भूखंडावर प्रशासकीय कामासाठी दोन मजली इमारत उभारण्यात आली असून भूखंडाच्या दुसºया टोकावरही एका वास्तूचे बांधकाम केले आहे. भूखंडावर निवारा शेडही उभारले असून यासाठी लाखोंचा खर्च केला आहे. काही दिवस येथे बसेस थांबविल्या जात होत्या, पण नंतर डेपोचा वापर पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.महापे डेपोमध्ये २००८ च्या दरम्यान घंटागाडीच्या ठेकेदाराने गॅरेज सुरू केले होते. कचरा वाहतूक करणारी वाहने डेपोत उभी करण्यात येत होती. त्यांची दुरूस्तीसाठी कंटेनर केबिनमध्ये गॅरेज सुरू केले होते. यानंतर बाजूच्या गॅरेज चालकांनीही त्यांच्याकडे दुरूस्तीसाठी आलेली वाहने तेथे उभी करण्यास सुरवात केली होती. प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर डेपोतील अतिक्रमण थांबविण्यात आले असून तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे. पण सद्यस्थितीमध्ये डेपोतील इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे.महापे डेपोची अवस्था अत्यंत बिकट आहे. एमआयडीसीमधील या डेपोचा योग्य वापर करण्यात यावा यासाठी परिवहन समितीच्या बैठकीमध्ये आवाज उठविला जाईल. अशाप्रकारे कोणतीही मालमत्ता धूळ खात पडता कामा नये अशी आग्रही भूमिका आम्ही मांडणार असून वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- समीर बागवान,परिवहन सदस्य,शिवसेना