शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर पोलीस ठाणे दंगलीतील मुख्य आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 06:25 IST

शहरातील कोटरगेट मशिदीसमोरील नियोजित निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवून आणणाऱ्यांमधील मुख्य आरोपी युसूफ रजा यास मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी : शहरातील कोटरगेट मशिदीसमोरील नियोजित निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवून आणणाऱ्यांमधील मुख्य आरोपी युसूफ रजा यास मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली आहे.निजामपूर पोलीस ठाण्याची इमारत दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने तत्कालीन सरकारने शहरातील कोटरगेटसमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, तेथे २००६ मध्ये बांधकाम सुरू झाले होते. मात्र, काही दिवसांनी तेथील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध केला. पोलीस ठाण्याऐवजी तेथे दुसरा प्रकल्प राबवण्यासाठी नागरिकांनी सरकारकडे अर्ज केले होते. हा विरोध ५ जुलै २००६ ला उफाळून आला. नागरिकांनी पोलीस ठाण्याचे बांधकाम बंद पाडले. तत्कालीन पोलीस उपायुक्त आर.डी. शिंदे तेथे पोलीस फौजफाटा घेऊन गेले असता, रजा अ‍ॅकॅडमी संघटनेचा प्रमुख युसूफ रजा व शकील रजा यांनी नागरिकांना भडकावून पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवली. त्यावेळी शिंदे यांच्यासह ३९ पोलीस जखमी झाले होते. दोन पोलिसांना बागेफिरदोस येथे ठार मारले होते. याप्रकरणी युसूफ रजासह ४०० नागरिकांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या घटनेनंतर शकील रजा फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी देशातील विमानतळ प्राधिकरणास त्याची माहिती दिली होती. युसूफ रजा हा रविवारी सकाळी सौदी अरेबिया येथून मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, मुंबईतील सहार विमानतळावर त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, त्याला निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला दुपारी भिवंडी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी तळोजा कारागृहात केल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष घाटेकर यांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंग