शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निरगुडापाडा - धारखिंडच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सोडण्याचे जि.प.उपाध्यक्षाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:17 IST

 जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ

ठळक मुद्देया ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठानिरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर

ठाणे : शहापूर प्रमाणेच मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई जीव घेणी ठरत आहेत. या टंचाईवर मात करण्यासाठी आचारसंहिता शिथील होताच ठाणेजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आदिवासी, दुर्गम भागातील गावखे्यांचा दौरा सुरू केला. त्यातील निरगुडापाडा व धारखिंड येथील गावाकऱ्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी तत्काळ दोन टँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागास जारी करण्यात आले आहे.         जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ होत आहे. या पाशर््वभूमीवर पवार यांनी दौरा करून ठिकठिकाणची पाणी समस्य जाणून घेतली. या दरम्यान निरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी त्वरीत जारी केले आहे. या गावातील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी मजल दरमजल करून दूरवरून पाणी आणावे लागत होते. या परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करून तातडीची उपाययोजना म्हणून पवार यांनी दोन टँकरव्दारे पाणी पुरवठ्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या गावकºयांना रस्त्याची देखील समस्या भेडसावत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यावर देखील यावेळी चर्चा होऊन रस्ता दुरूस्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.------------ 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदWaterपाणी