विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे ठाणे जि.पच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:05 PM2019-05-19T19:05:43+5:302019-05-19T19:08:29+5:30

बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालावधीत वेतनाच्या विलंबामुळे बहुतांशी शिक्षकाना गावी देखील जाता आले नाही.

Due to the delayed salary, Thane District's primary teachers are angry | विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे ठाणे जि.पच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन विलंबाने

Next
ठळक मुद्दे१ तारखेस होणार वेतन २० ते २५ दिवस दिवस उशिराने बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाअंबरनाथ तालुक्यातील हजारो शिक्षकांचे वेतन शुक्रवारी झाले

ठाणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन विलंबाने होत आहे. १ तारखेस होणार वेतन २० ते २५ दिवस दिवस उशिराने होत आहे. यामुळे शिक्षकांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे प्रशासनाच्या निष्काळी विरोधात त्यांच्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालावधीत वेतनाच्या विलंबामुळे बहुतांशी शिक्षकाना गावी देखील जाता आले नाही. शिक्षकांच्या या आर्थिक विवंचनेला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग कारणी भूत असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.
अंबरनाथ तालुक्यातील हजारो शिक्षकांचे वेतन शुक्रवारी झाले. या वेतनास तेथील गट शिक्षणाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा नडल्याचे शिक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या मनमानी विरोधात बहुतांशी शिक्षकांनी एकत्र येऊन शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात त्यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर सायंकाळी या शिक्षकांचे वेतन करण्यात आले. अन्यथा या शिक्षकांना शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या सुटीनंतरच वेतन मिळाले असते. जिल्हा परिषदेच्या या शिक्षकांना मागील काही महिन्यांपासून प्रशासनाच्या हलगर्ती व निष्काळजीपणामुळे वेतनासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव या शिक्षकांनी निदर्शनात आणून देत प्रशासनालाही धारेवर धरले आहे.

Web Title: Due to the delayed salary, Thane District's primary teachers are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.