निरंजन डावखरे, मयुरेश जोशींच्या कल्पनेतून ठाण्यात प्लाझ्मा हेल्पलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:32+5:302021-05-05T05:05:32+5:30
ठाणे : ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ऑनलाइन प्लाझ्मा हेल्पलाइनचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात ...

निरंजन डावखरे, मयुरेश जोशींच्या कल्पनेतून ठाण्यात प्लाझ्मा हेल्पलाइन
ठाणे : ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठीच्या ऑनलाइन प्लाझ्मा हेल्पलाइनचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांच्या संकल्पेतून ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची औषधे, बेड आणि प्लाझ्मासाठी प्रचंड धावपळ होत आहे. यासाठी हे हेल्पलाइन पोर्टल ड्यूएल मोड पद्धतीने चालणार आहे. प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तो मिळेल, तर ज्यांना प्लाझ्मादान करावयाचा आहे, त्यांनाही मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या ठाणे शहरातील रुग्णांना संपर्क करण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारपासून दररोज २० याप्रमाणे महिन्याभरात किमान ६०० रुग्णांना हेल्पलाइनमार्फत प्लाझ्मा उपलब्ध होईल, असे यावेळी मयुरेश जोशी यांनी सांगितले.
फडणवीस यांनी या www.bjpthane4plasma.co.in या हेल्पलाइनचे कौतुक केले. कोरोनामधून बरे झालेल्या ठाणेकरांनी या हेल्पलाइनच्या माध्यमातून अधिकाधिक प्लाझ्मा दान करुन गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, मयुरेश जोशी, युवामोर्चाचे समर्थ नायक आदी पदाधिकारी उपस्थित होते.