ठाण्याचे नऊ जलतरणपटू चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:08 IST2019-11-17T23:08:41+5:302019-11-17T23:08:43+5:30
अर्चित सालीची मेक्सिको स्पर्धेसाठी निवड; थायलंडमध्ये फडकावला तिरंगा

ठाण्याचे नऊ जलतरणपटू चमकले
ठाणे : थायलंड येथील क्राबी बीच येथे ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ओशियनमॉन २०१९ स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोटर््स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली आहे. यात १० किमी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या अर्चित साली याची डिसेंबर महिन्यात मेक्सिको येथे होणाºया वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत जगातील ५० देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये ठाण्यातील एकूण नऊ जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. दहा किमी स्पर्धेत अर्चित साली याने तृतीय क्र मांक मिळवून कांस्यपदक पटकावले. तर, दोन किमी स्पर्धेत चिरायू चौलकर याने तेविसावा तर विजय ओजाळे याने ५१ वा क्र मांक प्राप्त केला. एक किमी स्पर्धेत आयुषी आखाडे हिने तिसरा क्र मांक मिळवून कांस्यपदक पटकावले, तर विराट ठक्कर याने पाचवा, राज उपलेटवाला याने आठवा, फ्रेया शहा हिने दहावा, युवराज राव याने चौदावा तर तृणांश गद्रे याने पंधरावा क्र मांक पटकावला.