ठाण्यात नऊ थर

By Admin | Updated: September 7, 2015 01:09 IST2015-09-07T01:09:03+5:302015-09-07T01:09:03+5:30

घाटकोपरच्या जय जवान गोविंदा पथकाने थरांचे निर्बंध धुडकावत रवींद्र फाटक यांच्या संकल्पच्या दहीहंडीत एकमेव ठिकाणी नऊ थर लावण्याचा विक्रम केला.

The nine layers in Thane | ठाण्यात नऊ थर

ठाण्यात नऊ थर

घाटकोपरच्या जय जवान गोविंदा पथकाने थरांचे निर्बंध धुडकावत रवींद्र फाटक यांच्या संकल्पच्या दहीहंडीत एकमेव ठिकाणी नऊ थर लावण्याचा विक्रम केला. ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, संस्कृती संकल्प, टेंभी नाका या ठिकाणी मात्र
५-६ थरांच्या पुढे कोणत्याही पथकाला अधिक थर लावण्याची परवानगी देण्यात आली नाही. दरवर्षी होणारी जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षची दहीहंडी यंदा दुष्काळाच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याने गोविंदांना तिची उणीव जाणवली. मात्र अनेक मंडळांनी ओपन हाउस पाचपाखाडी येथे थर उभारले व सलामी दिली. आयोजकांनी आपल्या दहीहंडीचे आकर्षण वाढविण्यासाठी अनेक सिनेकलाकारांना आमंत्रित केले होते. न्यायालयांचे निर्बंध, पाण्याचा किमान वापर, डीजेची अनुपस्थिती, खाली संरक्षक गादी, दुष्काळाचे सावट असे संमिश्र वातावरण असले तरी यंदा गोविंदांचा उत्साह नेहमीसारखाच जल्लोषपूर्ण होता.

Web Title: The nine layers in Thane