शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कामगार रुग्णालयात विद्युत सामग्री पुरविणा-याची नऊ लाख २५ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:29 IST

ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील शिवमंगल चौरसिया यांच्याकडून राज्य कामगार रुग्णालयासाठी १५ लाख ५० हजारांची विद्युत सामग्री खरेदी करुनही मुख्य ठेकेदाराने त्यांचे नऊ लाख २५ हजारांची फसवणूक केली.

ठळक मुद्देकिंगफोर्ट कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोघांचा समावेशवारंवार पाठपुरावा करुनही पैसे देण्यास टाळाटाळठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: राज्यभरातील कामगार विमा रुग्णालयात विद्युत सामग्री पुरवणा-या किंगफोर्ट कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार जतीन सेठी यांनी त्यांचा ठेकेदार महेश विश्वकर्मा यांच्याशी संगनमत करुन आर. आर. इलेक्ट्रीकल्स कंपनीची नऊ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.‘किंगफोर्ट कन्स्ट्रक्शन’चे सेठी यांनी ठेकेदार विश्वकर्मा याच्या मदतीने ठाण्याच्या लोकमान्य नगर येथील शिवमंगल चौरसिया यांच्याकडून आर. आर. केबल आणि आर. आर. इलेक्ट्रीकल्स कंपनीचे १५ लाख ५० हजार ७९८ रुपये किंमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. १ फेब्रुवारी २०१६ ते १९ मार्च २०१६ या कालावधीत मुंबई, ठाण्यासह महाराष्टÑातील कामगार विमा रुग्णालयासाठी ही विद्युत सामग्री घेण्यात आली होती. त्यापोटी चौरसिया यांना ५ मार्च २०१६ ते ९ जानेवारी २०१८ या कालावधीत सहा लाख २५ हजारांचे बिल देण्यात आले. मात्र, त्यांचे उर्वरित नऊ लाख २५ हजार ७८९ रुपये न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा करुनही ‘एनपीसीसी’कडून पेमेंट झाले नसल्याची बतावणी केली गेली. त्यांनी महेश विश्वकर्मा यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता, त्यांनीही किंगफोर्टमध्ये केलेल्या कामाचे आपल्याला पेमेंट मिळाले नसल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली. वारंवार पाठपुरावा करुनही सेठी आणि विश्वकर्मा यांच्याकडून पैसे चुकते न झाल्याने अखेर चौरसिया यांनी ९ जानेवारी रोजी या दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक सुहास हटेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस