ठाणे येऊरच्या बंगल्यांसह जंगलात शिरणाऱ्या थर्टीफस्टच्या तळीरामांवर रात्रंदिवस खडा पहारा

By सुरेश लोखंडे | Published: December 30, 2019 09:16 PM2019-12-30T21:16:11+5:302019-12-30T21:24:12+5:30

सुरेश लोखंडे ठाणे : जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी संजय गांधी राष्र्टीया  उद्याच्या सीमेवरील येऊर व उपवन जंगलात ...

Night and day watch on the shores of the terrestrial forest, including bungalows in Thane. | ठाणे येऊरच्या बंगल्यांसह जंगलात शिरणाऱ्या थर्टीफस्टच्या तळीरामांवर रात्रंदिवस खडा पहारा

येऊरच्या परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी २९ वनअधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रंदिवस तैनात

googlenewsNext
ठळक मुद्दे२०२० या नूतन वर्षाच्या संकल्पमध्ये बाधा येणार नाही यासाठी झिंगाटणाऱ्यांवर वन कायद्याखाली कडक कारवाईडीजेच्या ध्वनी प्रदुषणामुळे उद्यानातील पशूपक्षी, प्राणी सैरावैरा धावतात


सुरेश लोखंडे

ठाणे : जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी संजय गांधी राष्र्टीया  उद्याच्या सीमेवरील येऊर व उपवन जंगलात थर्टी फस्टचे तळीराम कोणत्याही चोरीच्या रस्त्यांनी घुसतात. या स्वागत पाट्यांच्या डीजेच्या ध्वनी प्रदुषणामुळे उद्यानातील पशूपक्षी, प्राणी सैरावैरा धावतात, जंगलास वनवा लागण्याची दाट शक्यता असते. यास वेळीच आळा घालण्यासाठी यंदा वनविभागाने जंगलात शिरणाऱ्यांवर खडा पहारा ठेवला आहे. या बंदीस न जुमानता धांगडधिंगा करून झिंगाटणाऱ्यांवर वन कायद्याखाली कडक कारवाईचे संख्येत मिळाले आहेत.
            येऊर गावातील हॉलीडे रिसॉर्ट, खाजगी बंगले, हॉटेल, निवासी घरे आदी ठिकाणी व येऊर उपवनातील जंगलातील महत्वाचे आठ पिकनिक स्पॉट्स हेरून चोरट्यावाटांनी तळीराम जंगलात जाण्याची शक्यता आहे. यावर लक्ष केंद्रीत करून येऊर परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांसह चेणा, घोडबंदर, नागलाबंदर आदी ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खडा पहारा लावला आहे. याप्रमाणेच येऊरच्या परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी २९ वनअधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रंदिवस तैनात ठेवले आहेत. यामुळे येऊर व उपवन, घोडबंदर, नागला बंदरकडे मोठ्याप्रमाणात ओढ असलेल्या ठाणे, मुंबई परिसरातील तरूणांच्या थर्टीफस्टच्या पार्टीवर वन अधिकाऱ्यांची करडी नजन लक्ष ठेवून आहे. वन अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून सोमवारपासून चोख बंदोबस्त लावला आहे.
       मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्र, ससुपाडा, एअर फोर्स, म्हातार खिंड, डिएसपी गेट आणि कोकणी पाडा आदी परिसरासरात स्थानिकांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मद्यपी धिंगाणा घालतात. जबरदस्ती करून जंगलात प्रवेश करतात. एवढेच नव्हे तर जंगलाच्या चोरवाटांनी देखील जंगलात प्रवेश केला जातो. यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी येऊर, उपवनच्या जंगलात तैनात केलेले २९ अधिकारी, कर्मचारी आजपासूनच या परिसरातील वाहनांची तपासणी करीत आहेत. दारू आढळून आल्यास उत्पादन शुल्क विभागाकडे सोपण्याचे नियोजन आहे. प्रदूषण आढळून आल्यास त्याची नोंद घेऊन तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे नियोजन वन विभागाकडून करण्यात आले आहेत. यासाठी खास बंदोबस्त लावले आहेत. येऊरच्या ठिकठिकाणच्या प्रवेशव्दारावर तपासणी सुरू आहे. बंगल्याचे कारण सांगितले जात असले तरी खात्री करून त्यांची नोंद घेतली जात आहे. आवश्यत ठिकाणी सीसीटीव्हीचा देखील वापर करण्यात येत आहे.
          मधूबन गेट, एअर फोर्स, वणीचा पाडा, घाटोणपाडा, पाटणपाडा, रौनाचा पाडा, जांभूळपाडा, भेंडीपाडा, चेणा ब्रीज, चेणा नदी आदी ठिकाणांसह पिकनिक स्पॉट्सवर वनाधिकारी, पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहेत. मधुबन प्रवेशव्दारावर आठ वनपाल, वनरक्षक तर एअर फोर्सवर दोन वरनक्षक, म्हातारखिंडीही दोन, डिएसपी गेटवर तीन , मानपाडे येथील निसर्ग परिचय केंद्रांवर तीनख् ससुपाडा, आदीवासी निवासी पाडे, आदी ठिकाणी प्रत्येकी तीन आणि चेना ब्रीजवर दोन अधिकाऱ्यांना तैनात केले आहेत. या २९ वनाधिकारी, वनपालांच्या पथकांकडून संजय गांधी उद्यान, येऊर, उपवन या जंगलांमध्ये तळीराम शिरणार नाही, जंगलातील वन्यप्राण्यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.
      बंगलाच्या आवारात पार्टी करणाऱ्यांसाठी आधीच तंबी ध्वनीप्रदूषण होणार नाही; याची ग्वाही बंगल्याच्या मालकांकडून घेण्यात आली. यामुळे जंगल संपत्तीचे नुकसान होणार नाही, वणव्याचे संकट उद्भवणार नाही, मद्यपीचा भर रस्त्यात , जंगलात , पाणवठ्यावर तळीरामांचा धिंगाणा दिसणार नाही यासाठी हा कडक व चोख बंदोबस्त वनखात्याने लावला आहे. त्यांच्या सोबत पोलिसांचा खाक्या सुध्दा तळीरामांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
 २०१९ या जुन्या वर्षास निरोप व २०२० या नूतन वर्षाच्या संकल्पमध्ये बाधा येणार नाही यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. पर्यवरण प्रदुषित होणार नाही याची दखल वनविभाग, वन्यजीव प्रेमी आदींकडून घेतली जात आहे.

Web Title: Night and day watch on the shores of the terrestrial forest, including bungalows in Thane.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.