शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नियमांना बगल : पालघरचे बजेट मंजूर

By admin | Updated: March 2, 2016 01:39 IST

पालघर नगरपरिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या तसेच नगरपरिषदेच्या विशेष सभेसमोर अर्थसंकल्पाविषयी आवश्यक आकडेवारी सादर केलेली नसतानाही दोन्ही सभेने केवळ

हितेन नाईक,  पालघरपालघर नगरपरिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या तसेच नगरपरिषदेच्या विशेष सभेसमोर अर्थसंकल्पाविषयी आवश्यक आकडेवारी सादर केलेली नसतानाही दोन्ही सभेने केवळ जमा व खर्चाच्या आकडेवारीच्या आधारे उपस्थित नगरसेवकांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन आपल्या अज्ञानाचे व मिलीजुलीचे दर्शन घडविले. आश्चर्याची बाब म्हणजे काल (२९फेब्रुवारी रोजी) स. १० वा. स्थायी समिती समोर हा अर्थसंकल्प ठेवण्यात आल्यानंतर त्याला मान्यता मिळून अवघ्या दोन तासानंतर दुपारी १२ वा. विशेष सभेपुढे ठेवण्यात येऊन त्यास काही चर्चेनंतर मान्यता मिळाली.पालघर नगरपरिषदेसमोर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात आगामी वर्षात १५ कोटी ४४ लाख ९७ हजार इतके उत्पन्न अपेक्षीत असून १५ कोटी ९० लाख २१ हजार ३५० इतका खर्च अपेक्षीत असल्याचे दर्शविले आहे. अर्थसंकल्पात नगरसेवकांना आरंभीच्या शिल्लकेसह वर्षाखेरीज किती रक्कम शिल्लक राहणार आहे. याची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. विशेष सभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान स्वीकृत सदस्य अ‍ॅड जयंत राऊत यांनी या संबंधी विचारणा केली असता हा अर्थसंकल्प शिल्लकेचा अर्थसंकल्प आहे. मात्र किती शिल्लकेचा आहे. यासंबंधीची माहिती आपणास २-३ दिवसात उपलब्ध करून देतो असे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली. अर्थात यानंतरही सभागृहामध्ये या संबंधीची कोणतीही प्रतिक्रीया उमटल्याची दिसून आले नाही. किंबहुना उपस्थित नगरसेवकांनी याच स्थितीत अर्थसंकल्पाला मान्यता दिली.दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना आज या संबंधीची काही आकडेवारी उपलब्ध करून दिली असून हा अर्थसंकल्प ८३ लाख ९१ हजार ३५५ इतक्या शिल्लकेचा असल्याचे या माहितीवरून दिसून येते. मुख्याधिकाऱ्यांकडून आज उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आगामी वर्षात शिल्लक व जमा सह ३१ कोटी ६८ लाख ६७ हजार २०५ इतकी रक्कम जमा होईल तर आगामी वर्षात ३० कोटी ८४ लाख ९७ हजार ८५० इतका खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. आगामी वर्षात मालमत्ता करापोटी १० कोटी, पाणीपट्टी, ३.५ कोटी, विकास शुल्क २ कोटी, बाजार कर २५ लाख यासह पालीका सहाय्य अनुदान ४ कोटी, चौदावा वित्त आयोग २.२५ कोटी आदी महसुल अपेक्षीत धरण्यात आली असून विद्युत देयक ३ कोटी, स्वच्छता सफाई १.८० कोटी, कर्मचारीवेतन १.६० कोटी आदी प्रमुख खर्च अपेक्षीत करण्यात आला आहे. आगामी वर्षात रस्ते ३ कोटी, गटार २ कोटी, दलीत वस्ती कामे ३७ लाख आदी खर्च सुचविण्यात आला आहे. नगरपरिषदेने पालिका हद्दीत सिग्नलयंत्रणा व सीसीटीव्ही उभारण्याचा संकल्प केलेला असून कार्यालयीन इमारत व सफाई कामगार निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आली आहे. शहरात काही मार्गावर स्वच्छता गृह उभारण्याचाही संकल्पही या मध्ये अंतर्भूत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पाणेरी व टेंभोडे नाल्यामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी दिली.