वृत्तपत्र विक्रेत्यांवरच असते वृत्तपत्रांची मदार

By Admin | Updated: February 19, 2016 02:25 IST2016-02-19T02:25:50+5:302016-02-19T02:25:50+5:30

वृत्तपत्र विक्रेत्यांवरच वृत्तपत्रांची मदार असून त्यांनी वेळेत दिलेल्या सेवेमुळेच चोखंदळ वाचकांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेले सर्वाधिक खपाचे ‘लोकमत’सारखे वृत्तपत्र पडते.

Newspaper vendors only have newspapers | वृत्तपत्र विक्रेत्यांवरच असते वृत्तपत्रांची मदार

वृत्तपत्र विक्रेत्यांवरच असते वृत्तपत्रांची मदार

ठाणे : वृत्तपत्र विक्रेत्यांवरच वृत्तपत्रांची मदार असून त्यांनी वेळेत दिलेल्या सेवेमुळेच चोखंदळ वाचकांच्या हाती ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेले सर्वाधिक खपाचे ‘लोकमत’सारखे वृत्तपत्र पडते.
भल्या पहाटे वाचकांना वृत्तपत्र देण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विशेष मेहनत घेणारे विक्रेते हे वृत्तपत्रांच्या खपाचे खरे मानकरी असल्याचे कौतुकोद्गार ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी काढले. त्यांच्या मेहनतीचे कौतुक करून ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व विक्रेत्यांचे विशेष आभार मानले. नौपाड्यातील ‘जयभगवान’ सभागृहात गुरुवारी सकाळी पार पडलेल्या या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, मुंबई आवृत्तीचे वितरण महाव्यवस्थापक हारुण शेख, ठाणे शाखेचे सहायक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट, मुंबई विभागाचे वितरण व्यवस्थापक शरद सुरवसे, पनवेल शाखा व्यवस्थापक सागर गवांडे, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष राजेश मोरे, सरचिटणीस अजित पाटील तसेच ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, समीर कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक वितरण व्यवस्थापक सुबोध कांबळे यांनी केले. तर मुकेश मोरे, कांचन माळवे या प्रतिनिधींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली.नागपूरला वृत्तपत्र विक्रेत्याचा पुतळा ‘लोकमत’ने उभारला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल लोकमत वृत्तपत्रसमूहाने आत्मीयता दाखवून त्यांची खऱ्या अर्थाने दखल घेतल्याबद्दल राजेश मोरे यांनी या वेळी आभार मानले.विजय कांबळे ठरले केंद्रबिंदू
‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमांतर्गत सर्वाधिक बक्षिसे पटकावण्याचा मान राबोडी येथील वृत्तपत्रविक्रेते विजय कांबळे यांनी मिळवला. त्यांना स्मार्ट फोन, टॅबलेट, इंडक्शन कुकर, डिनर सेट आणि इस्त्री आदी वस्तू लकी ड्रॉमार्फत मिळाल्या. त्यामुळे या सोहळ्याचे ते एका अर्थाने केंद्रबिंदू ठरले. लोकमतच्या काहीतर कर ठाणेकर या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली आणि विजेत्या विक्रेत्यांचा गुरुवारी लोकमत परिवारातर्फे गौरव करण्यात आला, त्या वेळचे छायाचित्र.

Web Title: Newspaper vendors only have newspapers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.