नवीन वर्ष शालिवाहन शके 1947 च्या पंचांगात दोन गुढीपाडवे - सोमण
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 20, 2025 13:50 IST2025-03-20T13:49:46+5:302025-03-20T13:50:39+5:30
प्रज्ञा म्हात्रे ठाणे - गुढीपाडवा यावर्षी रविवार 30 मार्च 2025 रोजी आहे. या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक 1947 सुरू होत ...

नवीन वर्ष शालिवाहन शके 1947 च्या पंचांगात दोन गुढीपाडवे - सोमण
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - गुढीपाडवा यावर्षी रविवार 30 मार्च 2025 रोजी आहे. या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक 1947 सुरू होत आहे. या नूतन वर्षाच्या पंचांगात वर्षारंभी रविवार 30 मार्च 2025 रोजी आणि वर्ष अखेरीस 19 मार्च 2026 रोजी असे दोन गुढीपाडवे आले आहेत. असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितलं.
सोमण म्हणाले की, गुरुवार 19 मार्च 2026 रोजी फाल्गुन अमावास्या सकाळी 6-53 वाजता संपते आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा दुस-या दिवशी सूर्योदयापूर्वी संपत असल्यामुळे ( म्हणजे क्षयतिथी होत असल्याने )फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी सकाळी 6-53 नंतर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. यापूर्वी सन 2017 ( शके 1939) मध्ये असे आले होते. यानंतर सन 2032 ( शके 1954) मध्ये असे येणार असल्याचेही सोमण यांनी स्पष्ट केलं.