शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

नवे कल्याण... दिसायला देखणे, पण सुविधांच्या नावे ठणाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:47 AM

एखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही.

प्रशांत माने, कल्याणएखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही. वसवण्यात आलेली नगरी बाहेरून सुसज्ज आणि कॉर्पाेरेट दिसत असली, तरी हा भपका कितपत दिखावा आहे, याची प्रचीती अनुभवल्याशिवाय येत नाही. असेच काहीसे चित्र नवकल्याण पाहिले की, स्पष्ट होते. जुने कल्याणच्या मानाने सुस्थितीत वसलेल्या या नवकल्याणला सद्य:स्थितीत अवकळा आली आहे. मूलभूत सुविधांची वानवा प्रकर्षाने जाणवत असताना फेरीवाले, भाजीविक्रेते यांचा वाढता पसारा आणि वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी दिसणारे कचºयाचे ढीग पाहता ही नवकल्याणनगरीही आता बकालतेच्या गर्तेत सापडल्याचे दिसत आहे.ठाण्यापाठोपाठ डोंबिवली, कल्याण शहरे विकसित झाल्यावर कल्याणमधीलच गावठाण भाग असलेल्या काही भागांमध्ये लोकवस्ती वाढू लागली. एकेकाळी दलदलीचा आणि टेकड्यांचा भाग असलेल्या या परिसरात टोलेजंग इमारती आणि मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. साधारण १९९६-९७ च्या काळापासून विकसित होणारा हा भाग ‘नवकल्याण’ म्हणून नावाजला जाऊ लागला. दाटीवाटीचा भाग असलेल्या जुने कल्याणपेक्षा हा परिसर मोकळा तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चाळींचे अतिक्रमण नव्हते. आगरी, कोळी समाजाची वस्ती असलेल्या या परिसरात विकासाला वाव मिळाला. विकासकांनी या ठिकाणी मोर्चा वळवला. रेल्वेस्थानकापासून थोडे दूर परंतु स्वस्तातील घरे म्हणून या ठिकाणी नागरिकीकरण झपाट्याने वाढले. कल्याण हे तालुक्याचे ठिकाण आहे, तसेच या ठिकाणी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, महापालिकेचे मुख्यालय, पंचायत समिती असल्याने या शहराला अधिक पसंती देण्यात आली. त्यात नवकल्याण हे सुनियोजित पद्धतीने उभे राहू लागल्याने येथे राहायला येणाºयांचा ओघ आपसूकच वाढला. केडीएमसी क्षेत्रातील वायलेनगर, गांधारे, उंबर्डे, बारावे, बिर्ला कॉलेज, खडकपाडा आणि मिलिंदनगर हे प्रभाग सहसा नवकल्याण परिसरात येतात. प्रारंभी जेव्हा या ठिकाणी विकास होऊ लागला, तेव्हा बेस्टची सिंगल इमारत, गोदरेज पार्क, निक्कीनगर, श्री कॉम्प्लेक्स अशी मोजकीच बांधकामे होती. बाकीचा सर्व भाग हा गावठाण होता. हळूहळू खडकपाडा, वायलेनगर, गांधारे, उंबर्डे, सापर्डे हे भाग विकसित होऊ लागले. दुर्गाडी ते प्रेम आॅटो या दरम्यानचा मुरबाड वळण रस्ता जेव्हा बनवला गेला, तेव्हापासून विकासाचा वेग वाढला. बारावे रस्ता झाल्यावर त्या ठिकाणी माधवसृष्टी कॉम्प्लेक्स उभे राहिले. जेव्हा मोठमोठी कॉम्प्लेक्स आणि गृहसंकुले उभी राहू लागली, तेव्हा अन्य विकासकांनाही या परिसराची भुरळ पडली आणि त्यांनीही या ठिकाणी बांधकामे उभी करायला सुरुवात केली. विकास आराखड्यानुसार मोठ्या रस्त्यांची बांधणी केल्यानंतर अंतर्गत रस्त्यांचेही जाळे विणले गेले. सुंदर आणि योग्य विकास अशी गणना होऊ लागलेल्या नवकल्याणमध्ये नोकरदारवर्ग, सरकारी कर्मचारी, शिक्षक अशा मध्यमवर्गीयांसह ठाणे जिल्हा आणि तालुक्यातील कुणबी समाज आणि खान्देश समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वसला. टोलेजंग इमारती पाहता येथे उच्चभ्रू वर्गाचाही कल वाढला. दरम्यान, हे नवकल्याण उभे राहून साधारण २० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, आजमितीलाही या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात पुरवण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे आजही खाजगी वाहनांशिवाय इच्छित स्थळ गाठणे, हाच एकमेव पर्याय येथील रहिवाशांसमोर आहे. रेल्वेस्थानक परिसराकडे जाण्यासाठी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून खाजगी बसची सुविधा आहे. परंतु, तीही कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांपुरतीच मर्यादित राहत असल्याने अन्य ठिकाणी राहणाºया रहिवाशांना खाजगी वाहन आणि रिक्षा प्रवासाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. केडीएमसीकडून भाजी मार्केटची सुविधाही आजवर देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर, चौकाचौकांत ठाण मांडलेले भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांकडूनच खरेदी करणे क्रमप्राप्त ठरत आहे. याच भागामध्ये केडीएमसीचा बारावे जलशुद्धीकरण केंद्राचा प्लांट असल्याने पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध होते. कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ते सुस्थितीत असले, तरी या ठिकाणीही जुने कल्याणप्रमाणे अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. जसे अन्य ठिकाणी कचºयाच्या समस्येने ग्रासले आहे, तसे चित्र येथेही दिसते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेबरोबरच आरोग्याचा प्रश्नही आ वासून उभा राहिला आहे. नवकल्याण उभे राहिले, परंतु या नवीन नगरीत सरकारी रुग्णालयाचीही वानवा आहे.एखादे शहर अथवा नगरी वसताना त्या ठिकाणी वाढणारे नागरिकीकरण पाहता त्या बदल्यात सुविधाही उपलब्ध करून देणे, हे तेथील व्यवस्थेचे कर्तव्य आहे. परंतु, नवकल्याणची सद्य:स्थिती पाहता बकालतेची झालर असलेल्या या भागात सुसज्ज मोठे मैदानही नाही. युनियन क्रि केट क्लबचे मैदान आहे, परंतु ते छोेटे असल्याने मुलांना कॉम्प्लेक्समधील आवाराचा मैदान म्हणून वापर करावा लागतो.पार्किंगचाही प्रश्न गंभीर : पार्किंगचीही समस्या जटील बनली आहे. कॉम्प्लेक्समधील वाहनेही आता रस्त्यावर उभी केली जातात. यातही येथील मोकळ्या जागेत जुने कल्याणमधील मोठ्या बसही बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जात आहे. ही नगरी वसवण्यात त्याचबरोबर चौकांचे सुभोभीकरण, रस्त्यांचा विकास असो, यात विकासकांचेही मोठे योगदान राहिले आहे. परंतु, महापालिकेची डोळेझाक आणि कृपाशीर्वादाने या नगरीला सद्य:स्थितीला अवकळा आली आहे.आजारपणात जुन्या कल्याणचा आधारकोकण वसाहतीत महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे, परंतु ते लांब असल्याने ते सोयीचे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. काही अपवाद वगळता काही रुग्णालयांमध्ये सुविधांच्या नावाने बोंब असल्याने येथील रहिवाशांना आजारपणात जुने कल्याणची वाट धरणे भाग पडते.आरक्षणे केवळ कागदोपत्रीचवारकरी भवन, महिला उद्योग केंद्र, मॅटर्निटी होम, उद्यान, स्टडी सेंटर आदींची आरक्षणे या नवकल्याणमध्ये आहेत. परंतु, ठोस अंमलबजावणीअभावी ही आरक्षणे कागदोपत्रीच राहिली आहेत. परिणामी, आजच्या घडीलाही या सुविधांपासून स्थानिक रहिवासी वंचित राहिले आहेत. मूलभूत सुविधांअभावी परवड होत असताना या ठिकाणी विजेचा लपंडावही कायम असल्याने ‘जुने कल्याण बरे’ अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर ओढवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका