शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात १५३९ रुग्णांची नव्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 06:11 IST

४२ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या १५३९ नव्या रुग्णांची बुधवारी वाढ झाली. यामुळे एकूण रुग्णसंंख्या ८२ हजार ७८९ झाली असून ४२ जणांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या आता दोन हजार २८४ झाली आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १८ हजार ४३७ झाली आहे. बुधवारीही नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ६१७ झाला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका परिसरात २७७ रुग्णांची वाढ झाली. तर, १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे रुग्णांची संख्या १९ हजार ३०९ तर मृतांची ३३६ झाली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३७५ रुग्णांसह तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १४५ रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ९८३ झाली असून मृतांची संख्या २६६ इतकी झाली आहे.

भिवंडी पालिका क्षेत्रात १२४ बाधित आढळले. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५६७ झाली आहे. तर, मृतांची संख्या १९४ वर स्थिर आहे उल्हासनगर पालिका परिसरात पाच जणांचा मृत्यू झाला असून ८५ नवे रुग्ण आढळले आहे. मृतांची संख्या १२४ तर बाधितांचा आकडा सहा हजार ६७३ झाला आहे. अंबरनाथमध्ये ८० नवे रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या तीन हजार ६८९, तर मृतांची संख्या १४६ आहे. बदलापूरमध्ये ४६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या दोन हजार ४४७ झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात २१९ नवे रुग्ण सापडले असून सहा जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या सहा हजार ५७ झाली आहे.वसई-विरारमध्ये १७७ नवीन रुग्णवसई-विरार पालिका परिसरामध्ये बुधवारी १७७ रुग्ण आढळून आले. तर, नालासोपाऱ्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ६४५ वर पोहोचली आहे. १२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण ३ हजार ७६४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.नवी मुंबईत ३७५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात बुधवारी ३७५ रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या १४,६२७ झाली आहे. बुधवारी बेलापूरमध्ये सर्वाधिक ८८ रूग्ण वाढले. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४0७ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस