नव्या अंगणवाड्या हव्यात
By Admin | Updated: July 11, 2016 01:41 IST2016-07-11T01:41:49+5:302016-07-11T01:41:49+5:30
तालुक्यातील २४६ अंगणवाडी केंद्रे (मूळ) व ४९ मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत़ विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यां

नव्या अंगणवाड्या हव्यात
राहुल वाडेकर, तलवाडा/विक्रमगड
तालुक्यातील २४६ अंगणवाडी केंद्रे (मूळ) व ४९ मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत़ विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेड्यात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत़ परंतु, विक्रमगड तालुक्यातील १११ अंगणवाड्यांना स्वत:च्या शासकीय इमारतीमध्ये जागा नसल्याने त्या खाजगी इमारतीत भरवल्या जात आहेत.
अगोदरच शासनाकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत. त्यात स्वत:ची इमारत नसल्याने अनेक अडचणी समोर येत असतात. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १११ नवीन अंगणवाडी बांधकाम वर्गखोली केंद्रांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप ही कामे अपूर्णच असल्याने नवीन अंगणवाडी केंद्रे कधी साकारणार, असा सवाल पालकांनी केला आहे़ तालुक्यातील अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालवण्यासाठी शासन पैसा खर्च करीत आहे तालुक्यातील १११ अंगणवाड्या या खाजगी किंवा समाजमंदिरात भरवल्या जातात़ ही केंद्रे शासनाची स्वत:ची इमारत नसल्याने जागेअभावी अनेक सुविधांविना आजही चालवल्या जात आहेत़