शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मामाकडे भाच्याने मागितली एक कोटीची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 11:13 IST

तरुणास अटक; एसीबीमध्ये तक्रार करण्याची दाखविली होती भीती

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : एमआयडीसीतून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या मामाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) भीती दाखवत त्याच्याकडून एक काेटीची खंडणी उकळणाऱ्या मंगेश अरुण थोरात (२९, रा. पाइपलाइन रोड, यशाेदानगर, सावेडी रोड, अहमदनगर) या भाच्याला ठाणे खंडणी विराेधी पथकाने अटक केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी सुभाष  तुपे (५९) हे एमआयडीसीतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी जयश्री तुपे यांनी एमआयडीसीमधूनच कार्यकारी अभियंता पदावरून राजीनामा दिला आहे.  तुपे दाम्पत्याने त्यांचा भाचा मंगेश याला व्यवसायासाठी ६१ लाख रुपये दिले होते. तसेच, या दाम्पत्याने पुनीत कुमार (रा. उत्तर प्रदेश) याच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने एक काेटी २५ लाखांची गुंतवणूक केली हाेती. यासंदर्भात करारही केला होता. परंतु, पुनीत कुमार त्यांना पैसे परत देत नव्हता. त्यामुळे तुपे दाम्पत्याने हे  पैसे काढून देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेशकडे हा करार देऊन काही रक्कमही दिली होती. जयश्री यांनी मंगेशला दिलेल्या करारनाम्याचा त्याने गैरफायदा घेऊन तसेच  संभाषण रेकाॅर्डिंगचा आधार घेत २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान तुपे दाम्पत्याला एसीबीमध्ये तक्रार आणि  बदनामीची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तर, आरोपीला दिलेले उसने पैसे परत मागू नये म्हणून त्याने दाम्पत्याकडे  एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. 

टॅग्स :thaneठाणेBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी