नेहरू तारांगणाची दुरूस्ती पडली लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:17 IST2018-02-21T18:11:27+5:302018-02-21T18:17:10+5:30
कल्याण: मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळी सणानंतरच मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तारांगणाची दुरूस्ती ही २ मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीत सहलीचा आनंद लुटण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावणार आहे. याला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला असताना २७ फेब्रुवारीला सहल निघेल हा सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केलेला दावाही फोल ठरला आहे.

केडीएमसी लोगो

गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहीले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. दरम्यान यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासिन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली असून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद आजवर लुटता आलेला नाही. यंदा ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. मुंबई दर्शनमध्ये नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग याठिकाणी दिवसभरात नेले जाणार आहे. परंतू सध्या नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगितले जात होते. तर २७ फेब्रुवारीला सहल निघेल असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम २ मार्च पर्यंत चालणार असल्याने त्यानंतरच सहल निघेल अशी माहीती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. २ मार्चला होळी आहे तर ३ मार्चला धुलीवंदन आहे. सुमारे साडेचार हजार विद्यार्थी सहलीला नेण्यात येणार असल्याने ही सहल टप्याटप्याने काढली जाणार असल्याने मार्चच्या पहिल्या अथवा दुस-या आठवडयापर्यंत हा सहलीचा कार्यक्रम चालेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.