शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

भिवंडीत रेल्वे प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता सुरू आहे मनमर्जी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:12 IST

Railway Project in Bhiwandi : भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही.

नितिन पंडीत

भिवंडी - वसई रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पनवेल -भिवंडी - वसई या मार्गावर दोन नव्या रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. सध्या या मार्गात जमीन अधिग्रहण व माती भराव असे काम सुरू आहे. मात्र माती भराव करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.            भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही. विशेष म्हणजे माती भराईसाठी खोदलेल्या या खड्ड्यात कंत्राटदाराने माती भराई केली नाही त्याच बरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा देखील या खड्डयाभोवती केलेली नाही. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या पावसात हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला असून या खड्ड्याला तलावाचे रूप आले आहे, विशेष म्हणजे या खोदकामाच्या बाजूला नागरिकांची घरे असून लहान मुले या खड्ड्यात दगड फेकायला जात आहेत. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

त्याचबरोबर या मार्गावर खारबाव तसेच भिवंडी रोड रेल्वे पुलाचे त्याच बरोबर छोट्या मोठ्या मोरीपूल तसेच वडघर येथील स्मशान भूमीजवळील पुलाचे काम देखील अपूर्ण आहे. मात्र ही कामे अपूर्ण असतांनाही या मार्गावर माती भराव करण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने वडघर येथे मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात सुरुवात केली आहे. हे माती भरावाचे काम करतांना संबंधित कामाचा ठेका घेणाऱ्या प्रसाद इन्फ्रा या कंपनीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होण्याकडे पुरता दुर्लक्ष करून माती भराव केल्याने याठिकणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. त्याकडे देखील ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे माती भरावाचे काम करणाऱ्या प्रसाद रोड अँड इन्फ्रा या ठेकेदाराला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश करावे अशी मागणी वडघर ग्रामस्थांनी भिवंडीचे प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्यासह तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडी