शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:45 IST

विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली.

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली. देशभरात हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ती चळवळ पुढे नेणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. यापुढेही रामजन्मभूमी हा विषय पूर्णत्वास जायलाच हवा, हा संकल्प आपण सगळ्यांनी करणे रामनवमीनिमित्त करायला हवे, असे आवाहन विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले.‘श्रद्धेय अशोक सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाण्यात शनिवारी टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा झाला. त्यावेळी परिषदेचे संघटन महामंत्री विनायक देशपांडे, कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंद जिंदल, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे संदीप लेले, प्रा. वरदराज बापट, अरविंद जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.अलोक कुमार म्हणाले की, देशामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वातावरण आहे. रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून सिंघल यांनी मोठे योगदान दिले. स्वत:ला पूर्णपणे मातृभूमीसाठी झोकून देऊन एका विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत राहणे, हे सोपे नसते. सिंघल हे तसेच जगले. त्यामुळेच ते विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनामनांत आजही जिवंत आहेत.या प्रतिष्ठानतर्फे हिंदुत्वाचा प्रसार करणाºया व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे संस्थापक संजय ढवळीकर यांनी सांगितले.हिंदुत्वाचा प्रसार, प्रचार करणे, हा प्रतिष्ठान स्थापण्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिला पुरस्कार व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना अलोक कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाण्यातील स्वामिनारायण मंदिराचे विश्वस्त स्वामी शास्त्री, स्वामी विवेक आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.>‘स्वातंत्र्य मिळवले’ असे शिकवा - शेवडेडॉ. शेवडे यांनी ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. हिंदू हा संस्कार असून ती जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आपली शिक्षणपद्धती ही चुकीची असून नकारात्मकता शिकवते. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते आपण मिळवले आहे. मिळाले ही भीक असून मिळवले यात त्याग आहे, बलिदान आहे. संघर्ष आहे, अभिमान आहे. हे युवकांना शिकवणे आवश्यक आहे.