राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाची प्रतिष्ठापना करण्यासह वारकऱ्यांसाठी योजना राबवण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:56 PM2018-12-04T18:56:37+5:302018-12-04T19:04:16+5:30

येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाºयांना त्यांनी जिल्हा बँकांसाठी व्यवसायीक उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे बँकेतील रोजचे वातारण सांप्रदायीक आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. अधिकारी, पदाधिकारी आणि अधिकाºयांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील, यामुळे बँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाही. परमेश्वर कृपेने बँकेची उन्नती होईल,

Need for implementation of Panduranga in district banks in the state and for the Warakaris! | राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाची प्रतिष्ठापना करण्यासह वारकऱ्यांसाठी योजना राबवण्याची गरज!

राज्यातील जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाची प्रतिष्ठापना करण्यासह वारकऱ्यांसाठी योजना राबवण्याची गरज!

Next
ठळक मुद्दे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापनाबँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाहीपांडुरंगाच्या भाविकांसाठी सुरू होणाऱ्यां  पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज

सुरेश लोखंडे
ठाणे : राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी त्यांच्या मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित आहे. याशिवाय पंढरीच्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणाना आर्थिक पाठबळ देणारी योजना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी सुरू करण्याची गरज आहे. यामुळे पांडुरंगाचे स्मरणही होत राहील आणि बँकांची उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ठाणे येथे व्यक्त केली.
येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात राज्यात प्रथमच विठू माऊलीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी जिल्हा बँकांसाठी व्यवसायीक उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. जिल्हा बँकांमध्ये पांडुरंगाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळे बँकेतील रोजचे वातारण सांप्रदायीक आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. अधिकारी, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील, यामुळे बँकेच्या कामकाजात कोणत्याही स्वरूपाच्या चुका परमेश्चर कृपेने होणार नाही. परमेश्वर कृपेने बँकेची उन्नती होईल, असे देखमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा बँकांनी वारकरी संप्रदायासाठी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. राज्यातील भाविकाना पांडुरंगाचे दर्शन घेणे शक्य व्हावे, त्यासाठी उद्भवणारी त्यांची आर्थिक चणचण दूर व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकांनी पंढरपूर तीर्थयात्रेला जाणाऱ्यां भाविकांसाठी कर्ज योजना हाती घेऊन त्यांना आर्थिक पाटबळ देण्याची गरज देखमुख यांनी व्यक्त केली.
पांडुरंगाच्या भाविकांसाठी सुरू होणाऱ्यां  पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज योजनेमुळे यामुळे बँकांची उन्नती होऊन उत्तरोत्तर प्रगती होईल आणि भाविकांचे पंढरपूर वारीही पूर्ण होण्यास मदत होईल असेही देखमुख यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले. या दौऱ्यांप्रसंगी त्यांनी टीडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन शेतकरी कर्जमाफीसह बचत गटांच्या कामही राज्यात टीडीसीसीचे उत्तम असल्याचे त्यांनी नमुद केले. ठेवीच्या तुलनेत बँकांनी कर्जांचे अधिकाधिक वितरण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अन्यही पदाधिकऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकारच्या विविध विषयांवर त्यांची यावेळी चर्चा केली.

Web Title: Need for implementation of Panduranga in district banks in the state and for the Warakaris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.