शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विखुरलेल्या नाभिक समाजाने एकत्र येण्याची गरज- महापौर मीनाक्षी शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: January 13, 2019 22:45 IST

नोकरी करणा-या आणि निर्व्यसनी मुलांना उपवर मुलींनी तर घर सांभाळणाºया सुशिक्षित तरुणींना उपवर मुलांनी नाभिक समाजाच्या वधू वर मेळाव्या प्रसंगी आपली पसंती दर्शविली. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी नोंदणी केली.

ठळक मुद्देठाण्यातील वधू वर मेळाव्यात व्यक्त केले मतराज्यभरातील समाज बांधवांची उपस्थितीनोकरी करणाऱ्या मुलांना मुलींंकडून प्राधान्य

ठाणे: विखुरलेल्या नाभिक समाजाने वधु वर मेळाव्यांसारख्या कार्यक्रमांमधून एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. ठाणे पूर्व भागातील कोपरी येथे श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी वधू वर पालक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत बोलत होत्या.श्री संत सेना पुरागामी नाभिक संघाने कोपरीतील आनंद बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या वधु वर पालक परिचय कार्यक्रमाचे कौतुक करुन शिंदे यांनी संपूर्ण शहरात विखुरलेल्या नाभिक समाज बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ब-याचदा अशा मेळाव्यांमध्ये केवळ पालकांची उपस्थिती असते. परंतू, तसे न होता उपवर मुला मुलींनीही आवर्जून येणे गरजेचे आहे. अशाच उपक्रमांमधून आपला समाज आणि बांधव एकत्र गुुंफला जात असतो. अशा प्रकारे विधायक उपक्रम संस्थेने राबविल्यास पालिकेतर्फे त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही आश्वासन महापौर शिंदे यांनी यावेळी दिले.यावेळी राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी या मेळाव्यामध्ये आपली नोंदणी केली. सरकारी नोकरी करणारा, वेल सेटल, उच्चशिक्षित, निर्व्यसनी आणि स्वत:चे घर अशा उपवर मुलाची अपेक्षा बहुतांश मुलींनी व्यक्त केली. तर मनमिळावू, घर सांभाळणारी आणि अनुरुप अशा मुलींची अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले, ‘लोकमत’चे प्रतिनिधी तथा संस्थेचे सल्लागार जितेंद्र कालेकर, हिंदू मुस्लीम एकता समितीचे शंकर राऊत, संस्थेचे माजी सचिव विठ्ठल दळवी, माजी अध्यक्ष अशोक राऊत, ज्ञानेश्वर शिंदे आणि सचिन शिंदे या प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सांगळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, उपाध्यक्ष सचिन कुटे, सेक्रेटरी अरविंद माने यांच्यासह राज्यभरातून अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते.जळगाव येथून आलेल्या जयविजय निकम दाम्पत्याने सात तासांमध्ये ६५१ महिलांचे हेअर कट करण्याच्या विश्व विक्रमाची नोंद बेस्ट इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २० आॅक्टोबर २०१८ रोजी जळगाव येथे केली. त्याबद्दल जयविजय निकम यांचा तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी झटणारे शंकर राऊत यांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिक