ठाणे : जिल्ह्यात एक हजार १२७ नवे रुग्ण शनिवारी आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ९९ हजार ३८७ झाली आहे. तर, दिवसभरात ३ ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाच हजार ४५ वर गेली आहे.
ठाण्यात ३२७ नवे रुग्ण आढळल्याने या शहरात ४३ हजार ३०५ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर, मृत्यू झाल्यामुळे आता मृत्यूंची संख्या एक हजार ९९ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २३८ रुग्णांची वाढ झाली असून आठ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये ३२ नवे रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीला २२ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला. यामुळे बाधित पाच हजार ६३३ तर मृतांची संख्या ३२८ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १०६ रुग्णांसह पाच मृत्यू नव्याने वाढले. अंबरनाथमध्ये नव्याने ३२ रुग्ण आढळले. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या सहा हजार ९६८ असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. बदलापूरमध्ये ४४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित सहा हजार ९१० झाले आहेत.
नवी मुंबईत ९१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त नवी मुंबई : शहरात शनिवारी ३२७ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३८१६४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के झाले आहे. दिवसभरात २४३ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या ४१९७३ झाली आहे. उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८४६ झाला आहे. वसई-विरारमध्ये ९ रुग्णांचा मृत्यू -वसई : वसई-विरार महापालिका परिसरात शनिवारी दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात १०१ नवे रुग्ण आढळून आले, तर १५३ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. आता शहरांत १ हजार ३८६ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात २२७ कोरोना रुग्णांची नोंद -अलिबाग : रायगड जिल्ह्यात १७ आॅक्टोबर रोजी २२७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५१ हजार ८७३ वर पोचली आहे. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १४६७ आहे तर, ४७ हजार ९७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.