शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:38 IST

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अनगाव - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उसगाव येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी नालासोपारा, विरार तसेच उसगावला दिले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरीवाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नाही.गणेशपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील कवाडपाडा येथे बोअरवेल आहे. पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. अशा नित्यानंद महाराज यांच्या पावनभूमीत आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही धक्कादायक बाब आहे.गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांना सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र, येथील नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनक्षेत्र हे कागदोपत्री आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते. पाणीटंचाईसंबंधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणीपुरवठा विभागाने का उपाययोजना केल्या नाहीत, असा प्रश्न संघटनेचे कार्यकर्ते जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.गणेशपुरी गावाजवळ असणाºया पाड्यांत टंचाई जाणवत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन काय करते आहे, की पाण्यासाठी एखादा जीव गमावल्यावर ते येथील टंचाई दूर करणार, असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.या पाड्यांवर बोअरवेल आहेत. त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. येथील पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कवाडपाडा येथे बोअरवेल आहे, मात्र पाणी नाही. पाण्याची टाकी आहे, ती कोरडी आहे. उसगाव येथील कातकरीवाडीत बोअरवेलला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकाकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षीही भिवंडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र अधिकारी ते मान्य करत नव्हते. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रकार उघड केला तेव्हा अधिकाºयांची धावपळ झाली. लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत अधिकाºयांना धारेवर धरले. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूया पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिलेली आहे. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विनोद पाटील, उपसरपंच, गणेशपुरी 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे