शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळेंचा गटनेतेपदाचा राजीनामा, पक्षाच्या कारभारावर टिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 17:08 IST

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.

ठळक मुद्देठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.दरम्यान पक्ष सोडणार का? असा सवाल त्यांना उपस्थित केला असता, तुर्तास तरी तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे - लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी आपल्याच पक्षाच्या विरोधात असहार पुकारत गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत विरोधी पक्षाची भुमिका बजावत नसून गटाच्या बैठकीत जे निर्णय होतात, ते बदलले जातात असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच काही ठरावही पक्षातील जेष्ठ मंडळी अचानकपणो बदलत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तुर्तास त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी ते येत्या काळात भाजप किंवा शिवसेनेची वाट धरण्याची शक्यता असल्याची माहितीही सुत्रांनी दिली. 

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. 2017 नंतर ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. केवळ टेंडरसाठी छुपी मैत्री केली जात असून मैत्री करायचीच तर खुलेपणाने करावी असा गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला आहे. गटाच्या बैठकीत काही निर्णय घेतले जातात. मात्र प्रत्यक्ष वेळी हे निर्णय बदलेले जात असून राष्ट्रवादी पक्ष केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजुने बोलत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. या संदर्भात वारंवार विरोधी पक्षनेते, पक्षातील श्रेष्ठी यांच्याकडेही तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच साध्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. क्लस्टरचा प्रस्ताव होत असतांना त्यामध्ये शास्त्री नगरचा समावेश होता. मात्र, त्या प्रस्तावाच्या ऐवजी दुसराच प्रस्ताव मंजुर झाला आणि त्यातून शास्त्रीनगरचे नाव वगळण्यात आले. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांची स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार नगरसेवक जाणो अपेक्षित असतांना केवळ या मंडळींचे असलेले छुप्या मैत्रीच्या संबधांमुळे तीनच सदस्य स्थायी समितीत गेले आहेत. कोणताही ठराव करतांना अथवा पक्षाची भुमिका विषद करतांना गटनेते म्हणून विश्वासात घेतले जात नाही, सत्ताधारी पक्ष व प्रशासनाचे उत्तम संबध असतांना स्वीकृत नगरसेवक म्हणून आपला एक नगरसेवक निवडून न येणे आदी मुद्यांना हात घालत त्यांनी आपल्याच पक्षातील वरीष्ठांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

जगदाळे शिवसेना का भाजपमध्ये जाणार दरम्यान पक्ष सोडणार का? असा सवाल त्यांना उपस्थित केला असता, तुर्तास तरी तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जगदाळे हे गणोश नाईक यांच्या संपर्कात असल्याची माहिती या निमित्ताने समोर येत असून नाईक यांच्या समवेत जगदाळे आणि त्यांचे इतर तीन सहकारी नगरसेवक आणि दिव्यातील व कळव्यातील दोन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र दुसरीकडे जगदाळे भाजपमध्ये न जाता शिवसेनेत यावेत यासाठी शिवसेनेकडून जोरदार फिल्डींग लावली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार जगदाळे यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी क्लस्टरचे अमीष दाखविले जात असून त्याच जोरावर त्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शिवसेनेच्या सुत्रंनी दिली.

सभागृहात आम्ही नेहमी विरोधी पक्षाची भुमिका चोख बजावलेली आहे. गटाच्या बैठकीत झालेले निर्णय बदलेले जातात असा जो काही आरोप आहे, तो चुकीचा आहे. वास्तविक पाहता तुम्ही गटनेता होता मग या विरोधात आवाज का नाही उठविला. पक्षाला बदनाम करण्याचे वारंवार काम आपण केले आहे. मागील 15 वर्षे आपण पक्षात विविध भुमिका बजावल्या असतांना आज आपणच पक्षाला बदनाम करणो कितपत योग्य आहे.(मिलिंद पाटील - विरोधी पक्षनेते - ठामपा) 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका